कोल्हापूर - कोरोनाकाळात लग्नसराईला बंदी आल्यानंतर राज्यात १७ जणांनी बेरोजगारीमूळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती ऑल महाराष्ट्र टेंट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी दिली. तसेच केटरिंग, फ्लॉवर, लाईट, मंडप यासह व्यवसाय संबंधित जिल्ह्यातील ५० हजार पेक्षा जास्त रोजंदारी कर्मचारी बेरोजगार झाले, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. राज्य सरकारने यांचा गांभीर्याने विचार करून अपेक्षित निर्णय घ्यावेत, अशी मागणी सागर चव्हाण यांनी केली.
कोरोनाकाळात राज्यात १७ जणांच्या आत्महत्या, मंडप डेकोरेशन कर्मचाऱ्यांची स्थिती देशात कोरोनाचा वेगाने प्रसार सुरू झाल्यानंतर मार्च मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, लग्नसमारंभ अशा सर्वच कार्यक्रमावर बंधी घालण्यात आली. यामुळे उदरनिर्वाहाची सर्वच साधने बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली. देशाची आर्थिक स्थिती कोसळत असताना हळूहळू लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करून लग्न समारंभ अशा कार्यक्रमांना मर्यादित उपस्थित असा नियम ठेवण्यात आला.अनलॉक प्रक्रियेत ५० लोकांच्या उपस्थित लग्नसभारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र त्याचा फटका त्या सभारंभावर अवलंबून असलेल्या जवळपास १० व्यवसायांना बसला. फ्लॉवर, लाईट, साउंड, मंडप, केटरिंग, फास्ट फूड, जनरेटर व्यवसायाला बसला. या व्यवसायाशी निगडित असलेल्या जिल्ह्यातील जवळपास ५० हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना व रोजंदारी कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत उपासमारीची वेळ आली.सर्वात जास्त फटका रोजंदारी कर्मचाऱ्यांना-
सर्वच कार्यक्रमांना निर्बंध आल्याने त्याचा सर्वाधिक फटका रोजंदारी कर्मचाऱ्यांना बसला. दिवसाला चारशे पाचशे रुपये कमवणाऱ्याला हाताला कामच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्मचारी हे रोजंदारीवर काम करतात. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोणामुळे अशा कार्यक्रमावर बंदी आल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात १७ जणांनी आत्महत्या केली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात एका कामगाराने आत्महत्या केल्याची माहिती सागर चव्हाण यांनी दिली.
४० हजारांचे काम ४ हजारांवर-
लग्नसमारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमात फ्लॉवर डेकोरेशन प्रचंड मागणी असते. लॉकडाऊन पूर्वी सजावटीचे कामाचा दर जवळपास २५ हजारांपासून पुढे एक लाखांपर्यंत ठरयाचा. तसेच त्याठिकाणी पाच-ते सहा कामगारांना दोन दिवसांचा रोजगार मिळायचा मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली. ४० हजार रुपयांचे काम नुकसान सहन करत ४ हजार रुपयाला करायला लागत आहे.तसेच कामगारांना घरी बसवून स्वतः मालक डेकोरेशनचे काम करत आहेत अशी माहिती, फ्लॉवर डेकोरेत जिल्हा अध्यक्ष आनंद पाटील यांनी दिली.
आयोजकांवर कारवाई करा, लॉन-कार्यालय मालकांवर नको-
कोरोनामुळे व्यवसाय डब घाईला आला असताना, नियमांचे पालन न केल्याने प्रशासन लॉन-कार्यालय चालकांवर कारवाई केली जात आहे. मात्र परवानगी घेत असताना आयोजकांनी त्यांचे नियम पाळणे गरजेचे आहे. असे लेखी आश्वासन आयोजकांनी घेतले असताना नियम मोडल्याची कारवाई आमच्यावर का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
वाढपी, मावशी यांच्यावर उपासमारीची वेळ-
लग्न समारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जेवण. यावर जवळपास ५० जणांना रोजगार मिळतो. मात्र कोरोना नंतर ही प्रथा बंद झाल्याने सभारंभात काम करणाऱ्या वाढपी, साफसफाई करणाऱ्या मावशी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या या सर्वांना फटका बसला आहे. जिल्ह्यात जवळपास २५ हजार पेक्षा जास्त कामगार केटरिंग व्यवसायाशी निगडित आहे. या सर्वांना याचा फटका बसला आहे. अशी माहिती जिल्हा केटरिंग असोसिएशनचे रमेश पुरोहित यांनी दिली.
हेही वाचा- मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ आढळली बेवारस कार, जिलेटीनच्या कांड्या सापडल्या