ETV Bharat / state

इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातही 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक - कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट

इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयातही 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक बसविण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या वाढती संख्या पाहता रुग्णांवर उपचार करण्यास कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये. तसेच रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सीपीआर नंतर इचलकरंजीतही ही ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Liquid oxygen tank
आयजीएम रुग्णालयातही 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक
author img

By

Published : Sep 12, 2020, 2:57 PM IST

कोल्हापूर - शहरासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलटरवर उपचार द्यावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील 20 हजार लीटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक बसवण्यात आला. त्यानंतर आता इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात देखील 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवसाला 200 हून अधिक रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय होणार आहे. रविवार पासून हा ऑक्सिजन टँक कार्यान्वित होणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेतले. जिल्हा नियोजन समितीमधून सीपीआरसाठी 20 हजार लिटरचा आणि इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयासाठी 6 हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँकच्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला व त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करण्यात आले.

सीपीआर नंतर आता इचलकरंजी येथे 17 फूट उंच, 2 फूट व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यात आला आहे. तसेच 200 क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचा वेपोरायझरही या ठिकाणी बसविण्यात आला आहे. 6 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून आयजीएम रुग्णालयात असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असून तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजनची सुविधा देण्यात येत आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा टँक बसविण्यात आला. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा टँक बसविण्यासाठी कोल्हापूर ऑक्सिजन लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता बी.एल.हजारे, शाखा अभियंता सतीश शिंदे, बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे, विनोद खोंद्रे यांचे पथक कार्यरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.