ETV Bharat / state

जिल्ह्यात केवळ 'इतक्या' नागरिकांना ई-पास; अनेकांची मागणी नाकारली

२२ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे जर काही अत्यावश्यक कारणासाठी कुणाला प्रवास करायचा असेल तर ई-पास काढावा लागणार आहे. कोल्हापूरमध्ये 1 हजार 617 नागरिकांनी ई-पासची मागणी केली होती. त्यातील केवळ 281 नागरिकांनाच ई-पास देण्यात आला.

Kolhapur E-Pass news
कोल्हापूर ई-पास परवानगी बातमी
author img

By

Published : Apr 25, 2021, 8:53 AM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 एप्रिलपासून राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय जिल्हाबंदी सुद्धा करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 617 नागरिकांनी ई-पासची मागणी केली होती. त्यातील केवळ 281 नागरिकांनाच ई-पास देण्यात आला आहे.

ई-पास संदर्भातील प्राप्त अहवालावर नजर -

  • ई-पाससाठी मागणी केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 617
  • ई-पास मागणी नाकारलेली संख्या - 1 हजार 332
  • मंजूर झालेले ई-पास - 281
  • मंजूर पण वैधता संपलेले पास - 4

ई-पास मिळविण्यासाठी काय करावे ?

  • ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in// या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • त्यानंतर 'apply for pass here' या पर्यायावर क्लिक करावे.
  • पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही नमूद करावे.
  • कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
  • अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
  • पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
  • या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

ई - पाससंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे -

  • घरातील व्यक्तीचा विवाहसोहळा, घरातील व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
  • अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
  • अत्यावश्यक सेवा जसे की, बँक, एटीएम, किराणा दुकान, भाजीपाला यांना शहरांतर्गत परवानगी दिली आहे यांना ई -पासची परवानगी लागणार नाही.
  • कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
  • ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अ‌ॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. तिथे त्यांची मदत केली जाईल.

कोरोना तोपर्यंत तुमच्या घरी येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला घ्यायला बाहेर जाणार नाही; त्यामुळे घरीच राहा - कोल्हापूर पोलीस

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे अनावश्यक कोणीही घरा बाहेर पडू नये. विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई होईल. मात्र, असे करून स्वतःसह आपल्या घरच्यांचा सुद्धा आपण जीव धोक्यात घालत आहात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.