ETV Bharat / state

Kolhapur will be peaceful : धगधगतं कोल्हापूर शांत होईल, संघटनांकडून ग्वाही, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

author img

By

Published : Jun 7, 2023, 10:17 PM IST

Updated : Jun 7, 2023, 10:57 PM IST

कोल्हापुरातील पुरोगामी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरात शांतता राखण्याचे अभिवचन दिले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्री बोलत होते.

दीपक केसरकर
दीपक केसरकर
केसरकर यांची पत्रकार परिषद

कोल्हापूर - खूप दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या या भूमीत पुम्हा असे घडणार नाही. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आलेल्या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडला होता. कोल्हापुरातील पुरोगामी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरात शांतता राखण्याचे अभिवचन दिले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्री बोलत होते.

शहरात संतप्त पडसाद - मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने,आज दुसऱ्या दिवशी शहरात संतप्त पडसाद उमटले. कोल्हापूर बंदची हाक दिल्यानंतर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व हिंदूवादी संघटना एकत्र आल्या. अखेर पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागल्याने, दगडफेक थांबली. दुपारनंतर कोल्हापुरातील वातावरण काही जे शांत झाले यानंतर मुंबईहून कोल्हापुरात आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला.

कोल्हापूर एकत्र राहिलेले मला मनापासून पाहायचे आहे - ज्या शहराने देशाला पुरोगामी विचार दिला. त्या शहरात अशा प्रकारचे जातीयवादी धार्मिक तेढ निर्माण होणारे प्रसंग घडले हे दुर्दैवी आहे. आज झालेल्या शांतता बैठकीत पुरोगामी आणि हिंदुत्ववादी तसेच मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. राजर्षी शाहूंच्या विचाराचे कोल्हापूर एकत्र राहिलेले पाहायचे आहे अशा भावना पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. बैठकीत हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी खडाजंगी झाली.

सतेज पाटील यांचा अंदाज खरा ठरला - काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील परिस्थिती पाहता कोल्हापुरात जातीय दंगली होण्याची शक्यता वर्तवली होती. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणाला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. पापाची तिकटी, पानलाइन, महापालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातील दुकाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला हटवले. मात्र जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली होती.

हेही वाचा...

  1. Rescue From Sandhan Valley: पर्यटकांनो काळजी घ्या, सांदण दरीत अडकलेल्या ५०० पर्यटकांची पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सुटका
  2. Fadnavis Reaction : अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या - देवेंद्र फडणवीस
  3. कोल्हापूरमधील इंटरनेट बंद, गृहविभागाचे आदेश, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचेही परिस्थितीवर लक्ष

Last Updated : Jun 7, 2023, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.