ETV Bharat / state

विशेष : बार, रेस्टॉरंटला परवानगी मग मंदिरांना बंदी का? अंबाबाई मंदिर परिसरातील विक्रेत्यांचा सवाल - open temples demand florists

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायला, मनाई करण्यात आली होती. यामुळे मंदिरे आणि आणि बारवरही बंद करण्यात आली होती. मात्र, आता रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरे सुरू करायलाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Florists kolhapur
कोल्हापर अंबाबाई मंदिर परिसरातील हार विक्रेते.
author img

By

Published : Oct 6, 2020, 5:29 PM IST

कोल्हापूर - गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरातील सर्वच मंदिर बंद आहेत. मात्र, जसजसा कोरोनाचा विळखा सैल होत चालला आहे तसतशी अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अनेक व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. नुकतीच बार आणि रेस्टॉरंट्सलाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही राज्यभरातील मंदिर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही आहे. यामुळे मंदिरे उघडण्यास का परवानगी नाही? असा सवाल येथील अंबाबाई मंदिर परिसरातील हार, ओटी साहित्य विक्रेते करत आहेत.

याबाबत कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर परिसरातील हार विक्रेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर हळूहळू अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यभरातील बार आणि रेस्टॉरंट्सही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे राज्यभरातील मंदिराबाहेर हार आणि ओटीसह अन्य पूजा साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्यावर अजूनही आर्थिक संकट कायम आहे.

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील विक्रेते सुद्धा आता संतप्त झाले आहेत. बार आणि रेस्टॉरंट्सला परवानगी मग मंदिरांना का नाही? आमचे व्यवसाय सुरू आहेत. मात्र, मंदिरच बंद असल्याने आमच्याकडचे साहित्य खरेदी करायला कोण येणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. 4 महिन्यांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पाडवा, गणपती उत्सव असे प्रमुख सणसुद्धा यावर्षी झाले. त्यामुळे किमान नवरात्रोत्सवात तरी मंदिर सुरू व्हावीत, अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असतो. मात्र, मुख्य सणावेळीच मंदिर बंद असल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर तत्काळ सुरू करावीत अशी मागणी केली.

  • शासनाने विक्रेत्यांना आर्थिक मदत करावी -

शासनाने विक्रेत्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय फेरीवाल्यांनासुद्धा मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आम्हाला काहीही मदत मिळाली नाही आहे. गेल्या 7 महिन्यांपासून व्यवसाय नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकतर लवकरात लवकर मंदिर उघडी करा किंव्हा आम्हा विक्रेत्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. दरम्यान, आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय निर्णय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.