ETV Bharat / state

Native Cow Village Kolhapur : एक समाज एक गाव, देशी गायींचे गाव म्हणून लक्ष्मीवाडीची ओळख! - या गावात केली जाते देशी गायींची पूजा

हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी ( Laxmiwadi village in Hatkanangle taluka ) गाव देशी गायींसाठी ( Native cow ) ओळखला जातो. जिल्ह्यातल्या इतर गावांपेक्षा आपली स्वतःची एक वेगळी ओळख या गावाची आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 1200 ते 1300 इतकी आहे. तर अडीचशेहुन अधिक घरे आहेत. मात्र गावात केवळ एकाच म्हणजे हणबर समाजाचे लोक ( People of Hanbar community ) राहतात.

Native Cow Village
Native Cow Village
author img

By

Published : May 13, 2022, 4:09 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील असा गाव ज्या गावात राहणारी सगळे मंडळी केवळ एकाच समाजाची आहेत. विशेष म्हणजे गावात असे एकही घर नाही ज्या घरात देशी गाय नाही. हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी ( Laxmiwadi village in Hatkanangle taluka ) असे या गावाचे नाव आहे. जिल्ह्यातल्या इतर गावांपेक्षा आपली स्वतःची एक वेगळी ओळख या गावाची आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 1200 ते 1300 इतकी आहे. तर अडीचशेहुन अधिक घरे आहेत. मात्र गावात केवळ एकाच म्हणजे हणबर समाजाचे लोक ( People of Hanbar community ) राहतात. इतर समाजातील एकही घर या गावात नाही. विशेष म्हणजे गावातील प्रत्येकजण शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय, म्हैस सुद्धा पाळतात. मात्र त्याबरोबरच प्रत्येकाच्या घरात देशी गाय ( Native cow ) सुद्धा पाळली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या गावातील सर्वजन देशी गायीचे संगोपन करत आले आहेत.

प्रतिनिधींनी लक्ष्मीवाडीमधून घेतलेला आढावा

हणबर समाज आणि गायीचे संगोपन : हणबर समाजाला गवळी समाज म्हणूनही ओळखले जाते. गोपालन या व्यवसायावरूनच त्यांना विशेष ओळख प्राप्त होते. गायी म्हैशींचा सांभाळ करून डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा हा समाज आहे. जो आजही आपली परंपरा जपत आला आहे. अनेकजण शिकून मोठ मोठ्या पदापर्यंत पोहोचली आहेत. मात्र आपल्या रूढी परंपरा ते आजही जपत आहेत. हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी हे सुद्धा असेच गाव आहे, जिथे हणबर समाजाची लोकं आहेत आणि विशेष म्हणजे गायी म्हैशींचा संगोपनाबरोबरच प्रत्येक घरात देशी गाय सुद्धा पाळली जाते. विशेष म्हणजे त्या गायींपासून काही उत्पन्न मिळावे यासाठी नाही तर केवळ गायीची पूजा करण्यासाठीच त्यांचे संगोपन केले जाते.

मुस्लिम समाजाचे एकही घर नाही तरीही गावात दर्गाह : या गावाची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे गावात एकही मुस्लिम समाजाचे घर नाही. तरीही गावात दर्गाह असून त्यामध्ये नित्यनियमाने पूजाही केली जाते. गावातीलच हणबर समाजातील एका व्यक्तीकडे याची जबादारी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गावातील सर्वजण भक्तिभावाने येथे येऊन प्रार्थना करत असतात. एकीकडे जातीजातींवरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे मात्र लक्ष्मीवाडीसारख्या गावाने जपलेली परंपरा अशा राजकारण्यांना चपराकच म्हणावी लागेल. शिवाय अशा राजकारण्यांच्या कोणीही लक्ष दिले नाही पाहिजे, असा संदेश सुद्धा गावातील सरपंच रामदास हांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय कुटुंब दिवस : 26 जणांचे कुटुंब नांदते गुण्यागोविंदाने, पाहा, दिंडोरीतील आदर्श कुटुंब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.