कोल्हापूर - दोन गव्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यात ही घटना घडली. आजराहून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला गव्यांची झुंज सुरू होती. त्यातील एक गवा आज सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. आजूबाजूच्या झाडांचेसुद्धा किरकोळ स्वरुपात नुकसान झाल्याचे दिसून आले. झुंजीमध्ये गवा उंच ठिकाणाहून रस्त्यावर पडल्यामुळे तो जबर जखमी झाला असून, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - Forest Department Action : वनविभागाची मोठी कारवाई; रानडुक्कर दात, साळींदरचे काटे, इंद्रजाल साठा जप्त
दुसरा गवा निघून गेल्याचे वाहनधारकांना दिसले
मिळालेल्या माहितीनुसार, आजरा गडहिंग्लज मार्गावर मसोबा मंदिराजवळच असलेल्या वनविभागाच्या हद्दीत दोन गव्यांची जोरदार टक्कर झाली. त्यांच्यातील या भांडणात एका गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही झुंज झाली होती तो भाग प्रमुख रस्त्यावरून थोड्या उंच ठिकाणी आहे. त्यामुळे झुंजीत एक गवा उंच ठिकाणावरून रस्त्यावर पडल्यामुळे तो जबर जखमी झाला आणि त्याचा त्यामध्येच मृत्यू झाल्याचे बोलले जाते. तर, दुसरा गवा तेथून निघून गेला, असे त्या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनधारकांना दिसले. दरम्यान, सदर माहिती आजरा वनविभाग यंत्रणेला प्राप्त होताच वनखात्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा केला.
हेही वाचा - Nitesh Rane in Kolhapur : वैद्यकीय तपासणीसाठी नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल