ETV Bharat / state

Tractor Trolley Overturns : ज्योतिबा दर्शनाहून परत येत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी

ज्योतिबा दर्शनाहून परत येत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एकाचा जागीच मृत्यू ( Tractor Trolley Overturns ) झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 13 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. ज्योतीबाचे दर्शन घेऊन येथील सदळे-मादळेमार्गे गावी परत जात असताना ही दुर्घटना घडली. अशोक शंकर गावडे ( वय 56 वर्षे), असे यातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

अपघातग्रस्त
अपघातग्रस्त
author img

By

Published : Mar 13, 2022, 10:26 PM IST

कोल्हापूर - ज्योतिबा दर्शनाहून परत येत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 13 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. ज्योतीबाचे दर्शन घेऊन येथील सदळे-मादळेमार्गे गावी परत जात असताना ही दुर्घटना घडली. अशोक शंकर गावडे ( वय 56 वर्षे), असे यातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळ

ऊस गळीत हंगाम संपल्याने जोतिबा दर्शनासाठी - मिळालेल्या माहितीनुसार, वारणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 20 ते 25 ऊसतोड मजूर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ज्योतिबा दर्शनासाठी गेले होते. ज्योतीबाचे दर्शन घेऊन सर्वजण घरी परतत असताना येथील सादळे-मादळे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. यातील काहींना येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कालच मंदिराचे दरवाजे उघडले - दरम्यान, दोन दिवसांपासून ज्योतिबा मंदिराचा दरवाजा उघडावा, यासाठी आंदोलन सुरू होते. आंदोलनाची दखल घेऊन देवस्थान समितीने मंदिराचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेत शनिवारी रात्री उशिरा दरवाजे उघडले. अनेक दिवसानंतर पुन्हा दरवाजे उघडल्याने भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच आनंदाचे वातावरण होते. मात्र, आज सायंकाळी या घडलेल्या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - E Pass Cancelled : अंबाबाईसह ज्योतिबा मंदिरातील ई-पासची आवश्यकता नाही भाविकांची तुडुंब गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.