कोल्हापूर- मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इचलकरंजीमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणावेळी आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते. सध्या लाक्षणिक उपोषण केले आहे, मात्र मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
उपोषणावेळी, तरुण पिढीसाठी मराठा आरक्षण अत्यंत गरजेचे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाद्वारे आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही सामाजिक जबाबदाऱ्या व शांततेच्या मार्गाने सामाजिक बांधिलकी जोपासून निराकरण करायचे आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी पूर्वी देखील मराठा समाजासोबत होतो आणि यापुढेसुद्धा मराठा समाजासोबत राहील. शिवाय आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असे आमदार प्रकाश आवाडे म्हाणाले.
हेही वाचा- अनलॉक - 5.0 : हॉटेल्स-बार आजपासून पूर्ववत