कोल्हापूर : छातीत तसेच पाठीचा त्रास सुरू झाल्याने आमदार नितेश राणे यांना काल उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरात हलविण्यात (Nitesh Rane was shifted to Kolhapur) आले. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना येथील 'आयसीयू'मध्ये हलविण्यात (Nitesh Rane in ICU) आले आहेत. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी दिली. राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ञांचा यामध्ये समावेश केलेला आहे.
एमआरआय करावा लागला तर राणेंना दुसरीकडे हलवावे लागणार :
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सीपीआर रुग्णालयात एमआरआयची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जर एमआरआय करावा लागलाच तर राणे यांना दुसरीकडे हलवावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर त्यानंतर मिरज येथे उपचार होतील अशी माहिती मिळत आहे.
आज दुपारपर्यंत चाचण्यांचे अहवाल येणार :
दरम्यान, नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना काल (सोमवारी) कोल्हापूरातील सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर विविध चाचण्या करण्यात आल्या. सीपीआरमधील तुळशी इमारती मध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील चाचण्यांसाठी आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांच्या पाठीमध्ये तसेच छातीमध्ये त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे अहवाल आज दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने कोठडी (MLA Nitesh Rane judicial custody) सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नितेश राणेंची प्रकृती जास्त बिघडली. ज्यामध्ये त्यांना पाठीचा आणि मानेचा तसेच छातीचा त्रास होत असल्याने नितेश राणे यांना कोल्हापुरात आणले आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सीपीआरमध्ये करण्यात आली. त्यानंतर आमदार नितेश राणे यांना ऍडमिट करण्यात आले आहे. दरम्यान आज दि. ९ रोजी त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याचे वृत्त आहे. रात्रीपासून तीनवेळा त्यांना उलट्या झाल्या त्यामुळे त्यांच्या तपासण्या पुढे ढकलल्या आहेत.