ETV Bharat / state

NCP Political Crisis : पक्ष मजबूत करण्यासाठी 16 जुलैला शरद पवार गटाचा कोल्हापुरात मेळावा; मुश्रीफ यांच्यासोबत गेलेल्यांची हकालपट्टींची मागणी - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्ष फुटीनंतर शरद पवार हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. मुश्रीफ यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच कोल्हापुरात पुन्हा पक्ष बांधून दाखवू. त्यासाठीचे नियोजन येत्या रविवारी 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर करू, असे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar group Melava
शरद पवार गटाचा मेळावा
author img

By

Published : Jul 10, 2023, 11:06 AM IST

'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांची बैठक

कोल्हापूर : शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनी बंडखोरी केली. अजित पवार आणि काही आमदार हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोल्हापुरात देखील आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्री पदाची शपथ घेतली. याचवेळी मुश्रीफ यांच्यासोबत कोल्हापुरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे ज्या कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

ताकदीने लढा देण्याचा निर्धार : शरद पवार यांना कोल्हापूर जिल्हा हा कायम महत्त्वाचा राहिला आहे. मात्र, याच कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे येथील अनेक पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत गेल्याने पक्षात फूट पडले आहे. ज्या शरद पवार यांनी पद, प्रतिष्ठा, नाव मिळवून दिले. त्या 'बापमाणसा'ला या वयात रस्त्यावर उतरायला लावणाऱ्यांविरोधात ताकदीने लढा देण्याचा निर्धार कोल्हापुरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांची बैठक : स्टेशन रोडवरील अयोध्या डेव्हलपर्सच्या कॉम्पलेक्समध्ये 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. ज्यांना अजून पक्षातून बाहेर पडायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही नवीन निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी उभारून पक्ष संघटन मजबूत करु, असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देवू. त्यासाठीचे नियोजन करण्यासाठी १६ जुलै रोजी मेळावा घेण्यात येणार असल्याचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी व्ही. बी. पाटील यांची निवड केली. तर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह अनिल साळोखे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र चव्हाण यांची पक्ष आणि पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.

क्रियाशील कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र : तर जिल्ह्यातील पक्षाच्या सुमारे ३ हजार क्रियाशील कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आर. के. पोवार यांनी केले आहे. तर पक्ष संघटन मजबूत करण्यासह शरद पवार यांच्यासोबत भक्कम राहण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, अमर चव्हाण, लखन बेराडे, नितीन जांभळे, जयकुमार शिंदे, रामराजे बदाले, चंद्रकांत वाकळे, प्रकाश पाटील, सरोजिनी जाधव, अश्‍विनी माने, जहिदा मुजावर, शिवानंद तेली, आबा पाटील, मुकुंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल घाटगे यांनी स्वागत केले. यावेळी रोहित पाटील, हिदायत मणेर, गणपतराव बागडी, निरंजन कदम, रमेश पोवार व शितल तिवडे उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis Update :खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी आम्ही शब्द मोडत नाही-संजय राऊत
  2. Maharashtra Political Crisis: आमदार सरोज अहिरे कोणाच्या सोबत? खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ मंत्री भुजबळांनी घेतली भेट
  3. Ramdas Athawale : '..तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते', रामदास आठवलेंचा मोठा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.