कोल्हापूर - शहरातील 'मटणाचा' वाद अध्यापही थांबताना दिसत नाही. मटण दरवाढीनंतर आता मटण दुकानातील अस्वच्छता आणि बेकायदेशीर कत्तलीवरून 'मटण दरवाढ कृती समिती' आक्रमक झाली आहे. त्यामुळे 'आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा' आरोप करत कोल्हापुरातील मटण दुकानदारांनी दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा... मुंबई : कामाठीपुऱ्यातील चायना इमारतीला आग, 8 गंभीर जखमी
मागील दीड महिन्यापासून कोल्हापुरात मटण दरवाढीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मटण दरवाढ कृती समिती आणि मटण विक्रेत्यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत या मटण दरवाढीवर तोडगा निघाला असला, तरी मटणावरचा वाद अद्यापही संपलेला दिसत नाही. निकष न पाळणाऱ्या मटण विक्रेत्यावर कारवाईसाठी मटण दरवाढ विरोधी कृती समितीने अन्न आणि औषध प्रशासन विभागासह महानगरपालिकेकडे आग्रह धरला. याच तक्रारीनंतर विक्रेत्यांनी प्रशासन आता आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. यामुळेच विक्रेत्यांनी दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. तेव्हा मटणाचा हा वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... 'ठाकरे नाव आहे, म्हणून थोडीफार किंमत आहे'; गुलाबराव पाटलांचा राज यांना टोला