कोल्हापूर - प्रेमप्रकरणातून एका युवतीच्या नातेवाईकांनी मारहाण करत 18 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. शिवतेज विनायक घाटगे (वय 18, रा. सातवे, ता. पन्हाळा) असे मृत युवकाचे नाव आहे. संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवतेजचा रुग्णालयात उपचार सुरु असताना दूर्देवी मृत्यू झाला आहे. हत्येमुळे सातवे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील शिवतेज विनायक घाटगे याला गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून शिराळा हद्दीमध्ये जबर मारहाण झाली होती. उपचार सुरु असताना आज (गुरुवार) त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री मांगले गावच्या हद्दीत धनटकी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतामध्ये घडली. शिवतेजचा मृत्यू झालेचे समजताच युवतीच्या नातेवाईकांनी गावातून पळ काढला असून या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. गावात सध्या तणावाचे वातावरण असून कोडोली पोलीसांनी सातवे गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. एकाच गावातील दोघे असल्याने गावात तणाव पसरला आहे. शवतेजचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. परंतु संशयित आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून नातेवाईकांनी आग्रह धरला आहे.
हेही वाचा - अपहरण करत सहा वर्षाच्या चिमुरडीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार