कोल्हापूर - सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना, उत्तर विभाग महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आबासाहेब मांडके असे या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचे सौर यंत्रणा विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. तक्रारदाराच्या ग्राहकाच्या घरी 10 किलोवॅटची सौर यंत्रणा बसवण्यात येणार होती. यंत्रणा बसवण्यासाठी महावितरणची परवानगी आवश्यक असते. परवानगी मिळण्यासाठी ग्राहकाच्या नावाने महावितरणच्या कार्यालयात अर्ज करण्यात आला होेता. अर्ज दाखल केल्यानंतर मांडके याने परवानगीसाठी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने या अभियंत्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
मांडके विरोधात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार तक्रार दाखल होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला. व या अभियंत्याला लाच घेताना पकडण्यात आले. या अभियंत्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Exclusive : कोविडच्या खात्म्यासाठी 'तारा' रोबोट तयार, शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून निर्मिती
हेही वाचा - विवाहित प्रेयसीची प्रियकराने केली गळा आवळून हत्या; २४ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या