ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक; 'खळखट्याक'चा दिला इशारा - प्रोत्साहनपर अनुदान

Hunger Strike : सरकारने २०१९ साली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून ५० हजार रुपये प्रोत्सहानपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, या लाभापासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळं दोन दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला.

Kolhapur News
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 10:32 PM IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू

कोल्हापूर Hunger Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या एक लाख वीस हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. पात्र असूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याच्या अटीवरून अपात्र करण्यात आलंय. या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा, मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

मनसे स्टाईलने करणार खळखट्यात आंदोलन : राज्य सरकारने पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सहकार विभागाच्या सहनिबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषणास सुरू केलंय. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असल्याने, अजूनही संबंधित विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्यात आंदोलन करण्याचा इशारा सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी दिला.

आंदोलनस्थळी लक्षवेधी फलक : पुसलेल्या कपाळाचं कुंकू, तुटलेल्या हातातील बांगड्या, हरपलेले बापाचे छत्र अन् लेकरांच्या विरहाच्या वेदना आता तरी थांबणार का?, 'कोरड्या भूमीच्या भेगांनी माईला गिळलं, अश्रूनी तिच्या भेगांना भिजवून टाकलं, माय बापाविना पोरकं ढोरासारख जगतं, जगण्यासाठीच मायबाप हात अनुदानासाठी पसरत', 'कोरड्या दुष्काळानं शेतकऱ्यांच्या सुखलेल्या घशाची सरसकट प्रोत्साहनपर अनुदान देऊन तहान भागवलीच पाहिजे', असं उपोषणाच्या ठिकाणी लावलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत.

हेही वाचा -

  1. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकीच
  2. ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार - मुख्यमंत्री
  3. कर्जमुक्ती योजना : गडचिरोली जिल्ह्यातील 12 हजार 611 शेतकऱ्यांच्या खात्यात 62.10 कोटी रुपये जमा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.