कोल्हापूर : जिल्ह्याचे आर्थिक वाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यापासून शांत झालेले वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होऊ लागली असून विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधार्यांच्या कारभारावर आक्षेप घेत लेखापरीक्षक मंडळाकडे तक्रार केली होती. यांच्या तक्रारीनुसार सरकारने आता 'गोकुळ'चे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार सतेज पाटील यांची मागणी : कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यावर आक्षेप घेत सांगितले की, लेखापरीक्षण केवळ सध्याचेच का? गेल्या पंचवीस वर्षापासूनचे केले पाहिजे. तसेच आम्ही ठरवले असते तर गोकुळ बरोबर राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो, मात्र आम्ही तसे केले नाही, असेही ते म्हणाले आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आक्षेप : गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक गटाची सत्ता असलेल्या गोकुळमध्ये सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्या गटाने सत्तांतर घडवत आपली सत्ता आणली. तेव्हापासून शौमिका महाडिक या गोकुळमध्ये सत्ताधार्यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. मुंबईतील पॅकिंगचा ठेका, 'गोकुळ'च्या सर्वसाधारण सभेचे बदलण्यात आलेले ठिकाण, वासाचे दूध, पशुखाद्याची ढासाळलेली गुणवत्ता आणि जिल्ह्यातील दूध संकलनात झालेली घट, यावर सत्ताधार्यांना त्यांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी सोशलमीडिया मधून 'गोकुळ'च्या लेखापरीक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करत लेखापरीक्षक मंडळाकडे तक्रार केली होती.
लेखापरीक्षण करण्याचे आदेश : गोकुळमध्ये सरकारकडून 2021-22 चे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष कार्यकारी अधिकारी रा. स. शिर्के यांनी दिले आहेत. यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता गोकुळ दूध संघात राजकारणाला सुरुवात झाली असून सतेज पाटील यांनी केवळ 2021-22 चे कशाला गेल्या पंचवीस वर्षापासूनचे लेखा परीक्षण करायाचे पत्र शौमिका महाडिक यांनी द्यायला हव होते.
आम्हीही प्रशासक नेमला असता : आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले की, सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने गोकुळमध्ये आमची सत्ता आली आहे. मागच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसचेच दुग्ध विकास मंत्री होते. तेव्हा आम्ही देखील गोकुळ आणि राजाराम कारखान्यावर प्रशासक नेमता आले असते. मात्र सहकार टिकले पाहिजे यासाठी आम्ही केले नाही. मात्र सरकार बदलले की सहकारमध्ये काही तरी केले पाहिजे यासाठी कोल्हापुरातील काही जणांकडून लेखापरीक्षांची मागणी केली गेली आहे.
मागील 25 वर्षाच्या लेखा परिक्षणाची मागणी : लेखा परिक्षणासाठी आम्ही तयार आहोत. मात्र ज्यांनी ही मागणी केली आहे, त्यांनी केवळ दोन वर्षाचीच मागणी पेक्षा गेल्या पंचवीस वर्षाची मागणी केली असती तर कोल्हापूरकरांना आणखी चांगले वाटले असते. असे म्हणत सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांना टोला लगावला आहे. स्वच्छतेचा डंका करत आहेत ते गेल्या 25 वर्षाचा देखील मागणी करायची होती. जे काही ठराव झाले ते सर्व त्यांच्याच काळात झाले होते. प्रत्येक सभेला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी एकाही सभेला विरोधात पत्र दिले नाही. मतदारांनी बहुमत ठेवून आम्हाला निवडून दिला आहे. पुढील पाच वर्षासाठी तुम्ही देखील निवडणुकीत उभे राहा मग जनता सांगेल, असेही यावेळेस सतेज पाटील म्हणाले आहेत.