ETV Bharat / state

MLA Satej Patil : ...तोपर्यंत आम्हाला सुरक्षा घेऊन फिरायची गरज नाही - आमदार सतेज पाटील - आमदार सतेज पाटील यांची शिंदे सरकारवर टीका

भाजप शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा ही काढून घेतली (Shinde government withdrawing security) आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिक्रिया येत असून जोपर्यंत जनता आमच्या सोबत आहे, तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही. असे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी म्हटले (MLA Satej Patil criticizes Shinde government) आहे.

MLA Satej Patil
आमदार सतेज पाटील
author img

By

Published : Oct 29, 2022, 9:04 AM IST

कोल्हापूर : भाजप शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा ही काढून घेतली (Shinde government withdrawing security) आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिक्रिया येत असून जोपर्यंत जनता आमच्या सोबत आहे, तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही. असे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी म्हटले (MLA Satej Patil criticizes Shinde government) आहे. तसेच सरकारने घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

नेत्यांची सुरक्षा काढली : राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन गोष्टी घडत असून आज राज्य सरकारने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा अचानकपणे ही काढली आहे. याबाबत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, गृहराज्यमंत्री असल्याने आम्हाला ती सुरक्षा देण्यात आली होती. मात्र एसआयटीने दिलेल्या अहवालानुसार खरंच या नेत्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे का नाही, या अहवालानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे का ? हे पाहणेही गरजेचे असल्याचे सतेज पाटील म्हणाले आहेत. नेत्यांना जी सुरक्षा पुरवली जाते, ती सत्ताधारी आणि विरोधक म्हणून नाही, तर त्या नेत्याला असलेला धोका पाहून सुरक्षा देण्यात येत असते. मात्र आज काढून घेण्यात आलेल्या सुरक्षेला कुठेतरी राजकीय वास येत असल्याची शंका सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले (MLA Satej Patil on withdrawing security) आहेत.

प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील

सुरक्षेत कपात : महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली (withdrawing security of MVA Leaders) आहे. सरकारने पवार आणि ठाकरे कुटुंब वगळता मविआच्या इतर बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र शिंदे सरकारने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली असून त्यांना आधी एक्स प्लस सुरक्षा होती. मात्र आता त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आणि एक्सकॉर्ट देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे.

सुरक्षा हटवण्यात आली : तर महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, नितीन राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवार यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता शिंदे सरकारने वरुण सरदेसाई यांची देखील सुरक्षा काढली आहे. तसेच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या संजय राऊत, १०० कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्याच कारागृहात असणारे राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मनी लाँड्रींगप्रकरणी आर्थर तुरुगांत असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या तिघांची देखील सुरक्षा हटवण्यात आली (security of MVA Leaders) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.