कोल्हापूर - दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील ( MLA Ruturaj Patil Tested Positive ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार पाटील यांनी ( MLA Ruturaj Patil Tweet On Covid Positive ) सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते घरातूनच उपचार घेत असून 2 दिवसांपूर्वी त्यांचे काका पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह आला होता. यानंतर ते घरातच उपचार घेत होते, अशातच आमदार ऋतुराज पाटील यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काय म्हटले ऋतुराज पाटील -
आमदार ऋतुराज पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना म्हटले की, नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
अनेक कार्यक्रमांना हजेरी -
आमदार ऋतुराज पाटील हे नेहमीच आपल्या मतदार संघात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. तसेच जनतेशी संवाददेखील साधत असतात. गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांनी अनेक कार्यक्रमांना तसेच उद्घाटनांना हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी काळजी घ्या तसेच कोरोना चाचणी करून घेण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा - मुंबईचे पेंग्विन विरुद्ध अहमदाबादचे पेंग्विन राजकीय सामना रंगणार.. महापौर पेडणेकर अहमदाबादच्या दौऱ्यावर