कोल्हापूर - गेल्या पाच वर्षांमध्ये शासन जनतेला भेटल आहे असं मला वाटत नसल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलेय. आज सकाळपासून जिल्ह्यातील अनेक लोक आमच्यापर्यंत प्रश्न घेऊन आले आहेत. आज जेवढी निवेदन आम्हाला मिळाली त्यापैकी सर्वाधिक प्रश्न महसूल खात्यातील असल्याचे म्हणत सतेज पाटील यांनी माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून लोकशाही दिन हा अभिनव असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूरचे जिल्ह्यातील हे तीनही मंत्री आज या लोकशाही दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी भेटून त्यांची निवेदने, प्रलंबित प्रश्न जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सकाळपासूनच मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळत असताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी या लोकशाही दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते. या संदर्भातच उपक्रमाची अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...