मुंबई - गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय सभासदांच्या हिताविरोधी आहे. मल्टीस्टेट करुन सरकारचे नियंत्रण टाळण्याचा संचालक मंडळाचा निर्णय असेल तर सरकार सहकार कायद्याने गोकुळ सभासदांच्या हितासाठी योग्य ती कारवाई करेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
हेही वाचा - कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत राडा
दरवेळी गोंधळ घालून सभा उधळणे खपवून घेतले जाणार नाही, असेही देशमुख यावेळी म्हणाले. तसेच संचालक मंडळाने भावनांची कदर करून गोकुळबद्दल निर्णय घेणे गरजेचे आहे. दरवर्षी गोंधळाचा प्रकार घडणे सभासद आणि ग्राहकांच्या दृष्टीने चांगली गोष्ट नसल्याचे देशमुख म्हणाले.
नेहमीप्रमाणेच गोकुळ दुध संघाच्या यंदाच्या सभेतही राडा झाला आहे. मल्टीस्टेटच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. सभेपुर्वीच दोन दिवस आधी गोकुळच्या अध्यक्षांनी मल्टीस्टेटचा प्रस्ताव रद्द केला असल्याचे पत्रक काढले होते. त्यामुळे यावेळी गोंधळ होणार नाही अशी शक्यता होती. पण मल्टीस्टेटच्या मुद्द्यांबरोबरच असे अनेक प्रश्न आहेत ज्या मुळे या सभेत पुन्हा गोंधळ झाला. विशेष म्हणजे यावर्षीच्या सभेत सभासदांना बोलण्यासाठी माईकच दिला नसल्याने विरोधकांनी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गोंधळ घातला.
हेही वाचा - मल्टीस्टेट विरोधातील लढा यशस्वी; गोकुळच्या इतर प्रश्नांसाठीचा लढा मात्र कायम - सतेज पाटील