कोल्हापूर - उच्च न्यायालय झाले, सर्वोच्च न्यायालय झाले पण न्यायालयाने सभासदांच्या बाजूने निकाल दिला आहे. सत्तारूढ गटाने आता जागतिक न्यायालयात जाऊ नये, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्या संदर्भात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. न्यायालयाचा निकाल म्हणजे सभासदांचा विजय असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायायालयाचा निर्णय आला आहे. 36 मतदान केंद्राऐवजी 70 ठिकाणी मतदान बूथ तयार करण्याच्या न्यायालयाने सूचना दिल्या आहे. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित सर्व नियम पळून पार पडेल. शेवटच्या तासात कोरोनाबाधित असलेले ठरावधारक मतदान करतील, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणले, सत्तारूढ गटाचे नेते न्यायालयाचे दरवाजे निवडणूक स्थगित व्हावी, यासाठी ठोठावत होते. विजयाचा आत्मविश्वास नसलेली मंडळी, असे काम करत असतात. परमेश्वर व नीती आमच्या पाठीशी आहे. न्यायलयाचा निकाल म्हणजे सभासदांचा विजय आहे, असे मुश्रीफ म्हणाले.