ETV Bharat / state

आरोग्य राज्यमंत्र्यांना कोल्हापुरच्या वीरमरण आलेल्या सुपुत्राचा विसर? - kolhapur breaking news

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील तरुणाला वयाच्या २०व्या वर्षी पाकच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले. सोमवारी शहीद ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव मूळगावी आणले. त्यांच्यावर भैरवनाथ हायस्कुलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Minister of State Rajendra Patil-Yadravkar
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
author img

By

Published : Nov 17, 2020, 7:05 AM IST

Updated : Nov 17, 2020, 9:44 AM IST

कोल्हापूर - ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्याचा जवान शहीद झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. असे असताना मात्र आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे यड्रावकर यांना शहीद जवानाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित होतोय. राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूर जिल्ह्याचे असून शिरोळ मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. अशात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खाजगी कार्यक्रमाला जाण्या पेक्षा शहीद जवानाच्या कुटूंबियांचे सांत्वन करणे आवश्यक होते अशी चर्चा आहे.

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील तरुण वयाच्या २० व्या वर्षी पाकच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाला. काल शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव मूळगावी आणल्यानंतर त्यांच्यावर भैरवनाथ हायस्कुलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक जोंधळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले होते. तर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसनमुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार संजय मंडलिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजयबाबा घाटगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

एकीकडे जिल्ह्यातील शहीद जवानावर अंत्यसंस्कार सुरू असताना दुसरीकडे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मात्र खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. त्यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांना शहिदाचा विसर पडला का? अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले- पोर्ले याठिकाणी एका पेट्रोल पंपाच्या कार्यक्रमाला यड्रावकर उपस्थित होते.

पाकिस्तानने उरी सेक्टरमध्ये केले होते शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवार (१३ नोव्हेंबर) जम्मू काश्मिरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये हुतात्मा झाले. भारताने देखील प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ सैनिक ठार झाले. तसेच, पाकिस्तानी बंकर, इंधनसाठे, दहशतवादी तळही नष्ट झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली होती.

भारतानेसुद्धा पाकला सडेतोड उत्तर द्यावे

ऋषिकेश हे दोन वर्षापूर्वी सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू-काश्मीर या ठिकाणी झाली. एकुलता एक असलेले ऋषिकेश यांना अवघ्या २० व्या वर्षी वीरमरण आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ज्या शाळेत ऋषिकेश जोंधळे शिकले, त्या शाळेच्या आवारातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा- हुतात्मा ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन; भाऊबीजेला बहिणीवर भावाच्या पार्थिवाला ओवाळण्याची वेळ

हेही वाचा- नाराज सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणूकीतून रयतचा उमेदवार मागे

Last Updated : Nov 17, 2020, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.