कोल्हापूर - राज्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळाल्याने कागलमध्ये उत्साह आहे. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचा मुरगूड येथे भव्य सत्कार झाला. मुरगुडमधील उत्साही कार्यकर्त्यांनी मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे पाचशे किलो फुलांचा हार घालून स्वागत केले. हा भव्य हार क्रेनच्या सहाय्याने या दोन्ही नेत्यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी डी. जे.च्या तालावर ठेकाही धरला. हसन मुश्रीफ मंत्री झाल्यापासून कागल मतदारसंघात अशाच प्रकारे त्याचं स्वागत होत आहे. त्यांच्या या अनोख्या स्वागताचा व्हिडिओ जिल्ह्यात व्हायरल होत आहे.
500 किलो फुलांचा हार घालून नूतन मंत्री मुश्रीफ यांचे मुरगूडमध्ये जोरदार स्वागत - Welcome to MusharIf in Murgood city
राज्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदार संघाला मंत्रीपद मिळाले आहे. यामुळे मुरगुड शहरात आमदार हसन मुश्रीफ यांचे स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर - राज्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळाल्याने कागलमध्ये उत्साह आहे. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचा मुरगूड येथे भव्य सत्कार झाला. मुरगुडमधील उत्साही कार्यकर्त्यांनी मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे पाचशे किलो फुलांचा हार घालून स्वागत केले. हा भव्य हार क्रेनच्या सहाय्याने या दोन्ही नेत्यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी डी. जे.च्या तालावर ठेकाही धरला. हसन मुश्रीफ मंत्री झाल्यापासून कागल मतदारसंघात अशाच प्रकारे त्याचं स्वागत होत आहे. त्यांच्या या अनोख्या स्वागताचा व्हिडिओ जिल्ह्यात व्हायरल होत आहे.
शेखर पाटील ईटीव्ही भारत कोल्हापूरBody:.Conclusion:.