ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील भित्रा माणूस; त्यांना योग्य उत्तर देऊ - मुश्रीफ - मंत्री हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील टीका

शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह टीका केलेल्या जिंदाल यांच्या बाबतीत फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा किंमत चुकविण्यास तयार राहा, असे मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, मुश्रीफ यांनी काय करायचे ते करावे, आम्ही माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. त्यावर आज मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Apr 4, 2021, 3:41 PM IST

कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा अतिशय भित्रा माणूस आहे, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह टीका केलेल्या जिंदाल यांच्या बाबतीत फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा किंमत चुकविण्यास तयार राहा, असे मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, मुश्रीफ यांनी काय करायचे ते करावे, आम्ही माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. त्यावर आज मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभेच्या जागेवर उभारण्याची त्यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा सोडून ते पुण्याला गेले, असे म्हणत मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. शिवाय गेल्या मंत्रिमंडळात सुद्धा अपघातानेच त्यांना दोन नंबरचे स्थान मिळाले होते, असे म्हणत त्यांना योग्य ते उत्तर देऊ, असा इशारा सुद्धा मुश्रीफ यांनी दिला.

प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही -

कोल्हापुरातून पळून जावे लागलेल्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राजकारण किती करायचे? याला काही मर्यादा आहे की नाही? असा प्रश्न करत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत, अशी टीका सुद्धा मुश्रीफ यांनी केली. शिवाय सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, काहीही आरोप करू देत, महाविकास आघाडी सरकार हे पंचवीस वर्षे चालणारच, असा विश्वास सुद्धा मुश्रीफांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.