कोल्हापूर - 'ते काही पण बोलतात', अशा शब्दात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे प्रसारमाध्यमेपण त्यांची दखल घेत नसल्याचाही टोला मुश्रीफ यांनी लगावला. मुश्रीफ मुरगुडमध्ये बोलत होते.
काय म्हणाले होते पाटील ?
आमदारकीच्या पेच प्रसंगातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागावा, असे आघाडीतीलच काही असंतुष्ट लोकांचे प्लॅनिंग असल्याचे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झाल्याने चंद्रकांत पाटील वारंवार अशी विधाने करत असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेले हे विधान जगातील सर्वात मोठा विनोद आहे, असे संबोधावे असेही त्यांनी म्हटले. हे कायपण बोलतायत, म्हणून प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्यांची दखल घेतली नाही, असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
हेही वाचा - कोरोनाशी लढा; उपासमार होणाऱ्या ४०० गरजूंना 'अभिगो'चा आधार, केले धान्यवाटप