कोल्हापूर: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत रुग्णालयात सुरू असलेल्या कामावर नाराजी दर्शवत डॉक्टरांना फैलावर घेतली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार: प्रत्येकाला शहरातच काम करायचे आहे, मग ग्रामीण भागातले काम कोण करणार? सीपीआर रुग्णालयामध्ये मशीन आहेत. मात्र डॉक्टर नाही अशी परिस्थिती आहे. जर डॉक्टर नसतील तर रोटेशन लावा म्हणत, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
70 साल पुराना जमाना अभी नही रहा: या आढावा बैठकीला राज्यसभा खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होती. गरिबांची सेवा करायला डॉक्टर होतो पण डॉक्टर झालो की हे विसरून जातो. जर डॉक्टर नसतील, तर त्याचे रोटेशन लावा. प्रत्येकाने शहरात थांबायचे मग ग्रामीण मधील काम कोण करणार? असा सवाल देखील भारती पवार यांनी केला. माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असेल, तर तुमचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.
केंद्रात डबल इंजिनच सरकार: मी इथून जायच्या आधी मला डॉक्टरांचे रोटेशन लावून दाखवा. 70 साल पुराना जमाना अभी नही रहा जिथे ग्रामीण भागात साधे बेसिक आरोग्य सुविधा ही मिळत नाहीत. आता भारतात आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे. आणि राज्यात आणि केंद्रात डबल इंजिनच सरकार आहे. आता तत्काळ सुविधा मिळाल्या पाहिजेत असे म्हणत खडे बोल सुनावत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ह्या चांगल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यावर भडकले आहेत.