कोल्हापूर - कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. मात्र या गंभीर गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच नागरिकांनी बांधून ठेवले आहे. इचलकरंजी येथील तेरवाड बंधाऱ्यावर अधिकाऱ्याला येथील स्थानिक ग्रामस्थांनी बांधून ठेवलं असून पंचगंगा नदी दूषित करणाऱ्यांवर कारवाई केली नसल्याने हे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. इचलकरंजी शहरानजीक असलेल्या तेरवाड बंधाऱ्यावर आज लाखो मृत माशांचा अक्षरशः खच लागलेला पाहायला मिळाला. त्यानंतर नदी किती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे, हे समोर आले आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून नदी दूषित करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी ठेवलं बांधून - पंचगंगा नदी प्रदुषित
कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. इचलकरंजी शहरानजीक असलेल्या तेरवाड बंधाऱ्यावर आज लाखो मृत माशांचा अक्षरशः खच लागलेला पाहायला मिळाला. नदीचे पाणीही काळे झाले आहे. यामुळे नदी किती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे, हे समोर आले आहे.