कोल्हापूर- ऊस परिषदेत एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू नका, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शनिवारी (दि.31 ऑक्टोबर) कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडणार आहे.
ऊस एफआरपीचा तिढा.. कोल्हापुरात स्वाभिमानी संघटना व कारखानदारांची उद्या बैठक - सतेज पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत साखर कारखाने सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता असून यावर तोडगा काढण्यासाठी उद्या तातडीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक बोलवली आहे.
स्वाभिमानी संघटना व कारखानदारांची उद्या बैठक
कोल्हापूर- ऊस परिषदेत एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू नका, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शनिवारी (दि.31 ऑक्टोबर) कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडणार आहे.
Last Updated : Oct 30, 2020, 6:20 PM IST