ETV Bharat / state

घाबरू नका..! कोल्हापुरात 'कोरोना' नाही; खबरदारीसाठी प्रशासन सज्ज

स्थानिक स्वराज्यसंस्था आणि सर्व सबंधित अधिकाऱ्यांना योग्य नियोजन, अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय कोरोना व्हायरस प्रतिबंध होण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत.

meeting-held-for-corona-virus-in-kolhapur
कोल्हापुरात 'कोरोना' नाही!
author img

By

Published : Mar 12, 2020, 7:54 PM IST

कोल्हापूर - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचे 14 रुग्ण आढळल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात एकूण 16 जण परदेशातून आले आहेत. त्यापैकी 9 जणांचे 14 दिवस निरीक्षण करण्यात आले. तर उर्वरीत 7 जण अद्यापही निरीक्षणात आहेत. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. पण प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापुरात 'कोरोना' नाही....

हेही वाचा- नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे

पत्रकार परिषदेला महानगरपालिका आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी. केम्पी-पाटील आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्यसंस्था आणि सर्व सबंधित अधिकाऱ्यांना योग्य नियोजन, अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय कोरोना व्हायरस प्रतिबंध होण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये एकूण 20 बेड, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 10 बेड, इचलकरंजी आय.जी.एम. येथे 4 बेड, गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयात 4 बेड आणि खासगी रुग्णालय अ‌ॅस्टर आधार येथे 10 बेड असे एकूण 48 आयसोलेशन बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत.

त्याच बरोबर कोरोनाग्रस्त देशामधील परदेशवारी करुन आलेल्या एकदम जास्त नागरिकांची संख्या असल्यास त्यांना एकत्रित ठेवून विलगीकरण करण्यासाठी अलगीकरण कक्ष (कोरोनटाईन) तयार करण्यात आला आहेत. या अलगीकरण (कोरोनटाईन) कक्षामध्ये ज्यांना कोरोनाचे लक्षणे नाहीत अशांना 14 दिवस एकत्र ठेवून निरीक्षण करण्यासाठी अलगीकरण (कोरोनटाईन) पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र येथे तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 40 रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच गरज पडल्यास प्रशिक्षण केंद्राच्या मेसमध्ये 20 रुग्णांची व्यवस्था करण्यात येऊ शकते, अशी माहिती सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.

2 फेब्रुवारी 2020 पासून एकूण 16 जण कोरोनाग्रस्त देशातून प्रवास करुन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्यात चीनमधून 5, इटलीतून 4, इराणमधून 1 आणि सौदी अरेबियातून 6 जणांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी 9 जणांना 14 दिवसाचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारे कोरोना सदृश आजाराची लक्षणे नाहीत. उर्वरित 7 जणांवर निरीक्षण चालू असून त्यांचा 14 दिवसाचा निरीक्षण कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. मात्र, त्यांनाही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हंटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.