ETV Bharat / state

मराठी शिकण्यासाठी आलेली मॉरिशसची विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे अडकली कोल्हापुरात; संपूर्ण वसतीगृहात राहतेय एकटी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू आहे. अनेकजण शहरातून आपापल्या गावी गेले आहेत. मॉरिशसमधील एक विद्यार्थिनी मात्र कोल्हापुरातच अडकून पडली आहे. पूर्वशा सखु असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Purvasha Sakhu
पूर्वाशा सखू, मॉरिशसची विद्यार्थिनी
author img

By

Published : Apr 30, 2020, 12:11 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे संपूर्ण जग शांत झाले आहे. भारतातही महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू आहे. अनेकजण शहरातून आपापल्या गावी गेले आहेत. मॉरिशसमधील एक विद्यार्थिनी मात्र कोल्हापुरातच अडकून पडली आहे. ती ज्या वसतीगृहामध्ये राहते तेथील 100 मुलींपैकी 99 मुली आपापल्या घरी गेल्याने एवढ्या मोठ्या वसतीगृहामध्ये ती एकटीच राहत आहे. पूर्वशा सखु असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापासून महावीर महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहामध्ये ती एकटी राहत आहे.

मराठी शिकण्यासाठी आलेली मॉरिशसची विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे अडकली कोल्हापुरात

2018 पासून कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयामध्ये पूर्वशा मराठीचा अभ्यास करत आहे. कोरोनामुळे अचानकच लॉकडाउन घोषित करण्यात आला आणि पूर्वशा कोल्हापुरारातच अडकली. अशा परिस्थितीत घरी परत जाण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने तिने वसतीगृहामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. महावीर महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. के. ए. कापसे आणि प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी तिची सगळी व्यवस्था केली असून तिला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कॉलेज प्रशासनाकडून विचारपूस केली जात आहे.

पूर्वशासाठी वसतीगृह अधिक्षिका स्वप्नाली मोरे वारंवार वसतीगृहात येतात. तिला कोणत्याही पद्धतीने मानसिक तणाव आणि एकटे वाटू नये म्हणून त्या तिच्या रूममध्ये जाऊन तिच्याशी गप्पा मारतात. अनेक विषयांवर चर्चा करतात. आपल्या संस्कृतीबाबत पूर्वशाला जाणून घेण्याची आवड असल्याने तीही अनेक गोष्टींबद्दल त्यांना विचारते.

लॉकडाऊनमुळे सर्वजण आपापल्या घरात आहेत. घरात बसून कंटाळलेले सर्वजण कधी एकदा लॉकडाऊन संपतो याची वाट बघत आहेत. पूर्वशाने मात्र या शांततेचा चांगल्या प्रकारे उपयोग केला आहे. आत्तापर्यंत तिने 15 ते 16 पुस्तकं वाचून काढली आहेत. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा ती तिच्या आई वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलते. वसतीगृह अधिक्षिका स्वप्नाली मोरे यांचा नातू सुद्धा पूर्वशाचा मित्र झाला आहे. त्याच्यासोबत ती दूरदर्शनवर नियमित रामायण बघते, अभ्यासातून कंटाळा आल्यावर त्याच्यासोबत जेवण करते आणि खेळते सुद्धा.

मॉरिशसमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ती देशात प्रथम आली. त्यामुळे तिच्या पुढच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी मॉरिशस सरकारने उचलली आहे. गेल्या 2 वर्षांपासून ती कोल्हापुरातल्या महावीर महाविद्यालयामध्ये मराठी भाषेचा अभ्यास करत आहे. केवळ तीन महिन्यांतच ती मराठी बोलायला शिकली. तिला आता मराठी भाषेमध्येच पीएचडी करण्याची इच्छा आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण जरी वैतागले असले तरी पूर्वशा मात्र हा संपूर्ण काळ एन्जॉय करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.