ETV Bharat / state

उंबरवाडीच्या मैदानाला शहीद जोतिबा चौगुले यांचे नाव द्या, सकल मराठा महासंघाची मागणी - मराठा महासंघ विषयी बातमी

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात १५ डिसेंबरला हुतात्मा झालेल्या जोतिबा चौगुले यांचे नाव उंबरवाडीच्या मैदानाल द्यावे, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे.

maratha-federation-demands-to-gave-name-of-martyr-jotiba-chougulmraatthaa-mhaasngh-vissyii-baatmiie-in-umberwadi-ground
उंबरवाडीच्या मैदानाला शहीद जोतिबा चौगुले यांचे नाव द्यावे
author img

By

Published : Dec 19, 2019, 7:32 PM IST

कोल्हापूर - जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडीचे जवान जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले. बुधवारी शहीद चौगुले यांच्यावर गावातील एका माळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उंबरवाडीच्या माळाचे आता क्रीडांगणात रूपांतर करण्यासाठी परवानगी मिळावी आणि या क्रीडांगणाला शहीद जोतिबा गणपती चौगुले क्रीडांगण नाव द्यावे, अशी मागणी सकल मराठा महासंघाकडून करण्यात आली आहे.

उंबरवाडीच्या मैदानाला शहीद जोतिबा चौगुले यांचे नाव द्यावे

हेही वाचा - 'जोतिबा चौगुले अमर रहे'.... म्हणत हुतात्मा जवानाच्या पत्नीने फोडला हंबरडा

होतकरू तरुण आणि खेळाडूंना सरावासाठी हे मैदान राखीव ठेवावे. त्यामुळे महागाव आणि ऊंबरवाडी येथील तरुण, खेळाडू लष्कर, पोलीस भरती सरावासाठी याचा वापर करू शकतील. यामुळे अनेक शूर जोतिबा चौगुले या गावात तयार होतील. त्यामुळे त्वरित या माळाला क्रीडांगणाची मंजुरी देऊन त्याला शहीद जोतिबा गणपती चौगुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी सकल मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत मानवाडकर यांनी केली आहे. हीच खरी आमच्या वीर पुत्राला श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - हुतात्मा जवान जोतिबा चौगुले अनंतात विलीन

Intro:जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून झालेल्या गोळीबारात 15 डिसेंबर रोजी गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी गावातील जवान जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले. काल बुधवारी शहीद चौगुले यांच्यावर गावातील एका माळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उंबरवाडीच्या या माळाला आता क्रीडांगणाला परवानगी मिळावी शिवाय त्याला शहीद कै. जोतिबा गणपती चौगुले क्रीडांगण नाव द्यावे अशी मागणी सकल मराठा महासंघाकडून करण्यात आली आहे. होतकरू तरुण आणि खेळाडूंना सरावासाठी हे मैदान राखीव ठेवावे. त्यामुळे महागाव आणि ऊंबरवाडी येथील तरुण खेळाडू आणि आर्मी पोलीस भरती सरावासाठी याचा वापर करू शकतील आणि अनेक शूर जोतिबा चौगुले या गावात तयार होतील. त्यामुळे त्वरित या काळाला क्रीडांगणाची मंजुरी देऊन त्याला शहीद जोतीबा गणपती चौगुले यांचे नाव द्यावे अशी मागणी सकल मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत मानवाडकर यांनी केलीये. हीच खरी आमच्या वीर पुत्राला श्रद्धांजली ठरेल असंही त्यांनी म्हंटलं आहे.

बाईट - लक्ष्मीकांत मानवाडकर, सकल मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.