ETV Bharat / state

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉक्टराच्या रुग्णालयाची तोडफोड - कोल्हापूर मराठा आरक्षण बातमी

मराठा आरक्षाणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची तोडफोड मराठा समाज नेत्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, त्या पत्राशी माझा काहीही संबंध नसल्याचे डॉ. तन्मय व्होरा यांनी सांगत माफी मागितली.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : May 26, 2021, 4:31 PM IST

Updated : May 26, 2021, 5:06 PM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची मराठा समाजाच्या नेत्यांकडून आज (दि. 26 मे) तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात असणाऱ्या सूर्या रुग्णालय येथे घडला आहे. 'सेव्ह मिरीट सेव्ह नेशन' या संस्थेच्या वतीने आरक्षणातून झालेली भरती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे संतापले नागरिकांनी संस्थेचे सदस्य असलेले डॉ. तन्मय व्होरा यांच्या रुग्णालयावर हल्लाबोल केला. दरम्यान, डॉ. तन्मय व्होरा यांनी मराठा समाजाची माफी मागत माझा यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉक्टराच्या रुग्णालयाची तोडफोड

आंदोलनकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. तर तरुणांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. असे असताना 'सेव्ह मिरीट सेव्ह नेशन' या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणातून झालेली भरती रद्द करावी, असे पत्र पाठवण्यात आले आहे. हे पत्र मराठा समाजाच्या हाती लागले आहे. त्याचे सदस्य असलेले कोल्हापुरातील डॉ. तन्मय व्होरा यांची माहिती घेऊन कोल्हापुरातील मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या रुग्णालयासमोर निदर्शन केली. यावेळी व्होरा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी व्होरा यांच्या रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने घोषणाबाजी करत रुग्णालयातील फलकाची तोडफोड केली. यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे कोरोनावर उपचार सुरू असणारे रुग्ण, नातेवाईक, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी पटापट दरवाजे बंद करत स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना जिन्यातच रोखले. तन्मय व्होराने मराठा समाजाची माफी मागून पत्र मागे घ्यावे, अशी आंदोलकांनी मागणी केली. मात्र, आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मराठा समाजाची माफी मागतो - डॉ. तन्मय व्होरा

संबंधित पत्र कोणी पाठवले याची कल्पना मला नाही. मी त्या संस्थेचा सभासद असलो तरी या पत्राची माझा कोणताही संबंध नाही. जर मराठा समाजाच्या भावना मी दुखावल्या असतील तर संपूर्ण मराठा समाजाची मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया डॉ. तन्मय व्होरा यांनी दिली.

हेही वाचा - कोल्हापूर : कोविड सेंटरमधून पळालेल्या दोन कैद्यांना पोलिसांनी केले जेरबंद

Last Updated : May 26, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.