ETV Bharat / state

आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी; डीएनए चाचणी करणार - भोंदूगिरीसाठी कवटी

आजरा तालुक्यातील सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना येथील रामतीर्थजवळच्या विजेच्या खांबाच्याखाली माणसाची कवटी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी नागरिकांनीसुद्धा ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी

author img

By

Published : May 12, 2022, 8:13 AM IST

कोल्हापूर : कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील रामतीर्थ येथे माणसाची कवटी आढळली आहे. चक्क माणसाची कवटी आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांनी सुद्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली आहे. शिवाय याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी
आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी
पोलिसांकडून तपास सुरू - मिळालेल्या माहितीनुसार, आजरा तालुक्यातील सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना येथील रामतीर्थजवळच्या विजेच्या खांबाच्याखाली माणसाची कवटी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी नागरिकांनीसुद्धा ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. ही कवटी भोंदूगिरी करण्यासाठी आणली असावी का? असाही प्रश्न या निमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान, आजरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन संबंधित कवटीचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली. मिळालेल्या कवटीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. शिवाय या कवटीची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.