ETV Bharat / state

कोरोना नियम झुगारून कर्नाटकातून महाराष्ट्रात सुरू आहेत प्रवेश; कुठलीही तपासणी नाही - कोरोना तपासणी नाके कोल्हापूर

राज्याच्या अनेक सिमांवर सध्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मात्र, कोल्हापूरच्या बाजूला असणार्‍या कर्नाटक सीमेवरती हे चित्र पाहायला मिळत नाही. शासनाच्या नवीन आदेशानुसार कोणत्याही पद्धतीची तपासणी केंद्र किंवा नाका याठिकाणी करण्यात आला नसून कर्नाटकसह गोव्यामधूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी या मार्गावरून महाराष्ट्रात येत आहेत.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 26, 2020, 5:15 PM IST

कोल्हापूर - परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. नुकतेच राज्य शासनाने याबाबतचा आदेश काढला असून राज्याच्या अनेक सिमांवर सध्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मात्र, कोल्हापूरच्या बाजूला असणार्‍या कर्नाटक सीमेवरती हे चित्र पाहायला मिळत नाही. शासनाच्या नवीन आदेशानुसार कोणत्याही पद्धतीची तपासणी केंद्र किंवा नाका याठिकाणी करण्यात आला नसून कर्नाटकसह गोव्यामधूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी या मार्गावरून महाराष्ट्रात येत आहेत.

कोरोना नियम झुगारून कर्नाटकातून महाराष्ट्रात सुरू आहेत प्रवेश

प्रवाशांना कोरोना नियमांचा विसर -

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी कोरोना नियम पाळत, काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये परराज्यातील प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. शिवाय विनामुखपट्या कोणत्याही प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असा नियम आहे. मात्र, अनेक प्रवासी तोंडाला काहीही न बांधता प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोगणोळीबरोबरच महाराष्ट्र्र हद्दीत सुद्धा कुठेही तपासणी नाका नाही -

कर्नाटक हद्दीत असणाऱ्या कोगणोळी टोल नाक्यावर अनेक प्रवाशी विनाकोरोना चाचणीचे महाराष्ट्रात जात असताना पाहिले. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱ्या नव्या आरटीओ तपासणी नाक्यावर सुद्धा कोणत्याही पद्धतीने तपासणी करण्यात येत नसल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वी इतर राज्यात जायचे असेल तर ई-पास बंधनकारक केला होता, तेव्हा याच तपासणी नाक्यावर प्रवाशांची तपासणी केली जायची, त्यांचे पास पाहिले जायचे. मात्र, सद्या याठिकाणी असे काहीही चित्र नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.