कोल्हापूर Kolhapur Agricultural Exhibition 2023 : कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भामटे गावचे अश्वप्रेमी दीपक देसाई यांच्याकडे काटेवाडी शामकर्ण जातीचा घोडा आहे. त्याचं 'शाहू' असं नामकरण करण्यात आलं आहे. (Dhangari Khilari Cow) 4 वर्षांच्या या घोड्याने आजवर अनेक ठिकाणी त्याच्या देखणेपणासाठी बक्षिसं मिळवली आहेत. फक्त लग्न वरात, मिरवणूक आणि पशू-पक्षी प्रदर्शन यासाठीच हा घोडा वापरला जातो, असं दीपक यांनी सांगितलं आहे.
'या' घोड्याची करावी लागते जपणूक: शाहू हा घोडा फक्त ४ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात देखील या घोड्याची ६ लाख रुपये किंमत आहे. सध्या देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, काळा पाच कल्याणी या जातीचे घोडे नागरिकांच्या औत्सुक्याचे ठरत आहेत. यापैकीच शामकर्ण जातीच्या असणाऱ्या या घोड्याला जपणे तितकेच गरजेचे असते. तसे केले तरच तो आपल्याला प्रसिध्दी मिळवून देतो. त्यामुळे आम्ही त्याची विशेष देखभाल घेतो, असं देखील दीपक देसाई यांनी स्पष्ट केलं.
का म्हटले जाते या घोड्याला शामकर्ण? भगवान श्रीकृष्णाच्या रथाला जे सात घोडे होते, त्यापैकी हा एक घोडा मानला जातो. शरीराचा पूर्ण रंग वेगळा आणि कानांचा रंग वेगळा, अशी या घोड्याची शरीररचना असते. यामध्ये कानाचा रंग हा काळा किंवा लाल असतो. याच वैशिष्ट्यांच्या आधारे त्याला शामकर्ण म्हटले जाते, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.
काय असतो या घोड्याचा खुराक? या देखण्या घोड्याचा खुराक देखील स्पेशल आहे. खुराकाला जोडूनच या घोड्याला रोज ४ लिटर दूध प्यायला दिले जाते. त्याच्या खुराकामध्ये हुलगा, उकडलेले शाबु असे घटक असतात. दररोज सकाळी ६ किलो आणि संध्याकाळी ६ किलो खाद्य या घोड्याला द्यावे लागते, असे दीपक देसाई यांनी सांगितले आहे.
प्रदर्शनात काय पहाल? महाराष्ट्रातून नामशेष होत असलेली धनगरी खिलारी जातीची गाय. या गाईच्या खोंडांना राज्यभरात शर्यतीसाठी मागणी आहे. याबरोबरच दीड फुटाची संकेश्वरी मिरची, रेड चेरी टोमॅटो, पाऊन किलोचा पेरू, सव्वा टन किलो वजनाची कपिला गाय या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.
हेही वाचा: