ETV Bharat / state

Look Back 2022 : वर्षभर राजकारणामुळे कोल्हापूर राहिला चर्चेत, घ्या महत्वाच्या घटना जाणून

2022 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी ( Look Back 2022 ) घडल्या . कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक सरपंच, प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन, विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी, जयप्रभा स्टुडिओची विक्रीमुळे जनआंदोलन अशा धटनांमुळे जिल्हा चर्चेत ( Year Ender 2022 ) राहिला.

Look Back 2022
वर्षभर कोल्हापूरातील राजकारणाने जिल्हा राहिला चर्चेत
author img

By

Published : Dec 31, 2022, 11:55 AM IST

कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देऊन आता सर्वजन नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले ( Look Back 2022 ) आहेत. याच सरत्या वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे. याच महत्वाच्या घटनांचा मागोवा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट... पाहा 2022 मध्ये कोल्हापूरात काय काय ( Look Back 2022 Kolhapur ) घडलं..

  • कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक : कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक जानेवारी मध्ये पार पडली. 5 जानेवारी रोजी मतदान झाले. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या तर 15 जागांसाठी निवडणूक लागली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाच्या विरोधात शिवसेनेने पॅनेल तयार करून ही निवडणूक लढवली. मात्र आपलाच सर्व जागांवर विजय होईल, असा दावा शिवसेना तसेच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केला होता. जवळपास एकूण ९९ टक्के इतके मतदान यासाठी झाले आणि हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचीच सत्ता बँकेवर (Year Ender 2022 Special ) आली.

  • प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन : शेतकरी, कामगार कष्टकरी, महिला यांच्यासह सबंध शोषित वर्गासाठी संपुर्ण आयुष्य पणाला लावणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने 17 जानेवारी रोजी महाराष्ट्रावर शोककळा ( Prof N D Patil passed away ) पसरली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे वृध्दापकाळाने कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वातावरणात बदल झाल्याने त्यांना कणकण वाटत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
    Year Ender 2022
    प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन

  • कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी : कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेसाठी (मालवाहतूक)भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने 10 जानेवारी रोजी मान्यता दिली. या नवीन सेवेमुळे जिल्ह्यातील शेती, शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे. तात्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली. ही एक मोठी बातमी संबंध कोल्हापूरकरांसाठी आहे.
  • LCB दोन पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात : पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील दोन कॉन्स्टेबल (LCB Constable) दहा लाख रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) अँटी करप्शनच्या (Kolhapur ACB) जाळ्यात सापडले. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन 25 लाख रुपयाची लाच मागितली होती. त्यातील दहा लाख रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी 21 जानेवारी 2022 रोजी रंगेहात पकडले. यामुळे संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली.

  • जयप्रभा स्टुडिओची विक्रीमुळे जनआंदोलन : कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री ( Jayaprabha Studio ) झाल्याची माहीती 11 फेब्रुवारी रोजी समोर आली. 15 फेब्रुवारी 2020 मध्येच जयप्रभा स्टुडिओची ही जागा तुकडे पाडत अनेकांना विकल्याचे समोर आले. 6 कोटी 50 लाखांना हा व्यवहार झाला. मात्र ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाल्याने पुन्हा एकदा जनआंदोलन सुरू झाले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा सुद्धा या खरेदी मध्ये समावेश आहे.
    Year Ender 2022
    जयप्रभा स्टुडिओ

  • काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी विक्रमी 61.19 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपकडून सत्यजित कदम ( Satyajeet Kadam BJP ) तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव ( Jayashri Jadhav INC ) रिंगणात आहेत. दोन्ही पक्षांकडून 15 दिवस जोरदार प्रचार सुरू होता. अनेक दिग्गज नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आले होते. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ( Gaurdian Minister Satej Patil ) या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतदारराजाने काँग्रेसला कौल देला आणि जयश्री जाधव यांचा यामध्ये विजय झाला.
    Year Ender 2022
    जयश्री जाधव यांचा मोठा विजय

  • पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी किताब : गेल्या 21 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला, कारण पृथ्वीराज पाटीलच्या रूपाने यंदा महाराष्ट्र केसरीची ( Maharashtra Kesari 2022 ) गदा कोल्हापूरकडे आली. अगदी लहानपणापासूनच पृथ्वीराजचा तालमीमध्ये शड्डू घुमत होता. अनेक वर्षांची मेहनत 9 एप्रिल रोजी फळाला आली आणि महाराष्ट्र केसरीचा किताब ( Prithviraj Patil Won Maharashtra Kesari 2022 ) त्याने आपल्या नावे केला. पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरला चिटपत केले. शिवाय त्याने बनकरचा स्पर्धेत 5-4 अशा गुणांनी पराभव केला. अवघ्या 22 व्या वर्षी त्याने हा किताब पटकावून अखंड कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापुढे ऑलम्पिक हेच त्याचे ध्येय असल्याचे त्याने म्हटले.
    Year Ender 2022
    पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी किताब

  • राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले : कोल्हापूरचे राजे आणि सामाजिक न्यायाचे कर्ते पुरस्कर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज ( rajarshi shahu maharaj ) यांचा 6 मे रोजी स्मृती दिवस ( shahu maharaj death anniversary ). यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र महाराजांना नमन करते. शाहू महाराजांनी समानता आणि न्यायाच्या आधारावर राज्य केले. कोल्हापूर संस्थानातील दलित, गरीब, आणि सामाजिक दृष्टया दबल्या पिचलेल्यांसाठी कायम संस्थात्मक काम उभे केले, अशा लोकराजाला महाराष्ट्र नमन करत असते. 2022 साली स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्ताने 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कोल्हापूरसह राज्यातील जनतेने शाहू महाराजांना अभिवादन केले.
    Year Ender 2022
    राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

  • विधवा प्रथा बंदी : कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू असून विधवा महिलांना सन्मान मिळवून देणारा विधवा प्रथा बंद (Stop Widow Tradition) करण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे. हेरवाड असे या गावचे नाव (Herwad Gram Panchayat) असून, इथल्या ग्रामपंचायतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजही 21 व्या शतकात अनेक ठिकाणी विधवा महिलांना वेगळी वागणूक मिळत असते. त्या सर्वांनी या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय आता पाहण्याची गरज आहे. यामध्ये विधवा महिलांना कुंकू पुसण्याची गरज नाही तर मंगळसूत्र सुद्धा काढायची गरज नसल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. त्याचे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी अनुकरण केले शिवाय शासनाने सुद्धा तसा निर्णय जाहीर करत याची प्रत्येक ग्रामपंचायतने अनुकरण करण्याचे आवाहन केले.

  • कोल्हापूरच्या कस्तूरी सावेकरकडून माउंट एव्हरेस्ट सर : कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने अखेर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी करून (Kasturi Savekar Mount Everest ) दाखवली. 14 मे रोजी पहाटे 6 वाजता जगातील सर्वात उंच आणि तितकेच अवघड असणारे माउंट एव्हरेस्ट तिने सर केले. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून सर्वच स्तरातून तिचे कौतुक झाले.
    Year Ender 2022
    कस्तूरी सावेकरकडून माउंट एव्हरेस्ट सर

  • राज्यसभेच्या निवडणुकीत महाडिकांची बाजी : संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी ( Mahadika victory in Rajya Sabha elections ) मारली. खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार व भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यात पाहायला मिळाली. महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव करत विजय खेचून आणला. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ज्या महाडिक घराला पराभव पत्करावे लागले त्याच घरात खासदारकी आल्याने महाडिक कुटुंबीयात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
    Year Ender 2022
    राज्यसभेच्या निवडणुकीत महाडिकांची बाजी

  • तृतीयपंथी नगरसेवक : संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत ( Transgender Corporator ) घडली. कारण या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले. तातोबा बाबूराव हांडे ( Tatoba Baburao Hande ) असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवकाचे नाव आहे. 22 जुलै रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने हांडे यांना हा बहूमान दिला.
    Year Ender 2022
    तृतीयपंथी नगरसेवक

  • NIA, ED, ATS कारवाईत एकजण ताब्यात : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि दहशतवादी विरोधी पथक (ATS) यांनी (action of NIA ED and ATS) एकत्रितपणे 22 सप्टेंबर रोजी देशभरातील विविध राज्यांमध्ये छापीमारी करून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) सदस्यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्रातील 20 जणांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये कोल्हापुरातील सुद्धा एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले (One person from Kolhapur is detained). देशभरातील एकूण दहा राज्यांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरातील जवाहरनगर येथील अब्दुल मौला मुल्ला याला ताब्यात घेण्यात आले.

  • कोल्हापूरात महाविकास आघाडीचे सरपंच सर्वाधिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यामध्ये 430 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक पार पडली. तर 30 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. जिल्ह्यात सर्वाधिक महाविकास आघाडीचे सरपंच बनले.
    Year Ender 2022
    ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक सरपंच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.