ETV Bharat / state

कोल्हापुरात वाढले कोरोनाचे आणखी 11 रुग्ण; इचलकरंजीत 72 तास कडक लॉकडाऊन - kolhapur covid 19 crisis

सोमवारी रात्री प्राप्त 11 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरामधील- 5,  भुदरगडमधील- 1, गडहिंग्लजमधील-2 आणि इचलकरंजीमधील 3 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने इचलकरंजी शहरात पुढचे 72 तास कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

kolhapur corona update
कोल्हापुरात वाढले कोरोनाचे आणखी 11 रुग्ण; इचलकरंजीत 72 तास कडक लॉकडाऊन
author img

By

Published : Jul 7, 2020, 8:07 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूरात सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत 141 प्राप्त अहवालापैकी 119 निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह झाले आहेत. तर यातील एकाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अजून 10 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सोमवार अखेर एकूण 977 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 748 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 216 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

सोमवारी रात्री प्राप्त 11 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरामधील- 5, भुदरगडमधील- 1, गडहिंग्लजमधील-2 आणि इचलकरंजीमधील 3 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने इचलकरंजी शहरात पुढचे 72 तास कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या -

आजरा- 92, भुदरगड- 77, चंदगड- 111, गडहिंग्लज- 112, गगनबावडा- 7, हातकणंगले- 18, कागल- 58, करवीर- 30, पन्हाळा- 29, राधानगरी- 73, शाहूवाडी- 187, शिरोळ- 12, नगरपरिषद क्षेत्र- 92, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-59 असे एकूण 957 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1 आणि सातारा-2 असे इतर जिल्हा व राज्यातील 20 असे मिळून एकूण 977 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 977 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 748 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 216 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.