ETV Bharat / state

Live In Relationship Special : लिव्ह इन रिलेशनमध्ये राहताय ? जाणून घ्या सविस्तर माहिती

author img

By

Published : Nov 19, 2022, 2:08 PM IST

दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने (Shraddha Murder Case) देशभरात खळबळ उडविली आहे. ही घटना विचारात घेता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना आपणही काय काळजी (Care taken living in live in relationship) घ्यायला हवी ? लिव्ह इनचे काय फायदे आणि धोके कोणते आहेत (live in relationship advantages and disadvantages) याची सविस्तर माहिती या विशेष रिपोर्ट मधून जाणून घेऊया.

Live In Relationship Special
लिव्ह इन रिलेशन

कोल्हापूर : सध्या दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा (Shraddha Murder Case) आणि आफताब यांच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना आपणही काय काळजी (Care taken living in live in relationship) घ्यायला हवी ? कोणकोणत्या गोष्टी तपासायला हव्यात तसेच या लिव्ह इनचे काय फायदे आणि धोके (live in relationship advantages and disadvantages) आहेत पाहुयात या विशेष रिपोर्टमधून...

लिव्ह इन रिलेशन म्हणजे नेमके काय ? आज काल प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे अनेक कपल आपल्याला पाहायला मिळतात. लहान शहरात एव्हड्या उघडपणे राहत नसले तरी मोठ्या शहरात ही गोष्ट आता खूपच कॉमन झाली आहे. लिव्ह इन रिलेशन म्हणजेच लग्नाआधी दोघांनी एकमेकांसोबत एकत्र राहायचे. अनेकांना लिव्ह इन मध्ये राहत असताना मनं, विचार जुळतात असे वाटले तर ते पुढे जाऊन लग्न सुद्धा करतात तर काहींचे नाते काही कारणात्सव पुढे लग्नापर्यंत जात नाही. अशा पद्धतीने राहणे कोणताही गुन्हा नसून फक्त दोघेही प्रौढ असणे गरजेचे आहे. शिवाय यामध्ये अनेक कायदेशीर बाबी सुद्धा आहेत.

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचे फायदे तोटे सांगताना वकील

समस्या आणि घ्यावयाची काळजी : लिव्ह इन रेलशन मध्ये राहत असताना अनेक जण ही गोष्ट मित्रांपासून तसेच घरच्यांपासून लपवून ठेवत असतात. छोट्या शहारांमध्ये हा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. मात्र एकंदरीतच लिव्ह इनमध्ये राहत असताना येणाऱ्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ? हे पाहणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या व्यक्तीसोबत राहत आहोत मग तो/ती नेमका कुठला आहे?, त्याच्या/तिच्या घरचे कुठे असतात? किंव्हा त्याच्या/तिच्या बद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय एकमेकांना दिलेली माहिती खरंच बरोबर आहे की, नाही याची शहानिशासुद्धा करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरून ओळख होऊन पुढे रिलेशन होत असेल तर त्यांनी तर याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. शिवाय आपण ज्याच्यासोबत राहत आहे हे आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा घरच्यांना विश्वासात घेऊन सांगणे गरजेचे आहे. असे वकील आकांक्षा कोल्हापूरे यांनी म्हटले आहे.

'या' गोष्टीमुळे वादाच्या शक्यता : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत असताना ज्या ठिकाणी राहणार आहे त्यावेळी दोघांमध्ये पैशाचे व्यवहार हे आधीच चर्चा करून झाले पाहिजे. पैसे हे वादाचे महत्त्वाचे कारण असू शकते. त्यामुळे राहणार असल्यापासून दैनंदिन येणाऱ्या सर्वच खर्चावर दोघांची कशी विभागणी असणार आहे? त्यावर चर्चा झाली पाहिजे. शिवाय लिव्ह इन मध्ये आपत्य जन्माला घालण्याबाबत सुद्धा बोलले जाते मात्र हे करत असताना त्याची जबाबदारी सुद्धा कोणाकडे असणार? त्याचे संगोपन कसे करणार आहे याबाबत चर्चा झाली पाहिजे असेही कोल्हापूरे यांनी म्हटले.

तर तुम्ही जवळच्या पोलिसांत तक्रार करा : हे सगळं जरी आपापल्या इच्छेनुसार होत असले तरी कधी कधी असेही प्रसंग येतात की दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होते. त्याची विविध कारणे असू शकतात. ज्यामध्ये शारीरिक त्रास तसेच मानसिक त्रासाला सुद्धा आपल्याला तोंड द्यावे लागू शकते. अशा वेळी कोणताही विचार न करता जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत रीतसर तक्रार सुद्धा करू शकता असेही अड. आकांक्षा कोल्हापुरे यांनी म्हंटले. त्यामुळे असा त्रास सहन न करता याबाबत आवाज उठवला पाहिजे आणि समोर येऊन बोलले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.