ETV Bharat / state

Kolhapur Jyotiba Yatra : दोन वर्षानंतर जोतिबा यात्रा; पालकमंत्री घेणार आढावा - कोल्हापूर जोतिबा यात्रा सतेज पाटील

जोतिबा डोंगरावर येत्या 16 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होणार ( Kolhapur Jyotiba Yatra ) आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यात्रा होणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Kolhapur Jyotiba Yatra
Kolhapur Jyotiba Yatra
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:13 PM IST

कोल्हापूर - जोतिबा डोंगरावर येत्या 16 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होणार ( Kolhapur Jyotiba Yatra ) आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यात्रा होणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जोतिबा डोंगरावर सुद्धा स्थानिक नागरिक तसेच व्यवसायिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

श्री क्षेत्र जोतिबा येथे दरवर्षी लाखो भक्त चैत्र यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे त्याची जय्यत तयारी केली जाते. दोन वर्षांपासून यात्रा झाली नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भक्त येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आत्तापासून तयारी सुरु करण्यात आली असून, पालकमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil On Jyotiba Yatra ) आज ( बुधवार ) याबाबतचा आढावा घेणार आहेत.

मंदिराची रंगरंगोटी तसेच स्वच्छतेची कामे सुरू - जोतिबा मंदिरात यात्रेसाठी रंगरंगोटी तसेच स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत. संपूर्ण मंदिर पाण्याने धुवून काढण्यात येणार आहे. मंदिराचे शिखर, दीपमाळ, दगडी कमानी, पालखी आदी साहित्यांची सुद्धा स्वच्छता होणार आहे. विशेष म्हणजे यंदा जोतिबा मंदिराच्या भोवती असलेली लोखंडी ग्रील काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंदिराचे मूळ दगडी रूप भक्तांना दिसणार आहे.

हेही वाचा - Nana Patole Reply Sujay Vikhe : काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार; नाना पटोलेंचा सुजय विखेंवर पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.