ETV Bharat / state

Succeed In UPSC : आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही कोल्हापूरच्या स्वप्नील मानेचे यूपीएससीत यश - after losing his parents

केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससी (UPSC) परीक्षेत कोल्हापूरातल्या कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली गावातील 26 वर्षीय युवकाने बाजी मारली (Succeed In UPSC ) आहे. स्वप्नील तुकाराम माने (Kolhapur's Swapnil Mane) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आई वडिलांचे छत्र हरवले असताना (after losing his parents) स्वतः कमवून त्याने आपला इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

Swapnil Mane
स्वप्नील माने
author img

By

Published : May 30, 2022, 6:15 PM IST

कोल्हापूर: स्वप्नील हा लहानपनापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याची शिकण्याची जिद्द होती. त्यानुसार त्याने बी टेक मध्ये प्रवेश घेतला होता. या दरम्यान, 2006 साली आई वैशाली माने यांचे अचानक निधन झाले त्यांच्या पाठोपाठ त्याचे वडील तुकाराम माने यांचेही 2018 मध्ये निधन झाले. वडिलांचा कोल्हापूर येथे फरशी विक्रीचा छोटा व्यवसाय होता. मात्र आई वडिलांचा आधार गेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या हिंमतीने त्याने शिक्षण पूर्ण केले आणि आज या यशापर्यंत येऊन पोहोचला आहे.

स्वप्नीलच्या घरी आजी, आजोबा एक छोटी बहीण स्नेहल असा परिवार आहे. दुसरी बहिण प्रज्ञा यांचे लग्न झाले आहे. स्वप्नील हा लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचा. त्याला आजपर्यंत अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये त्याला कार्यक्रमांसाठी सुद्धा बोलावले जात होते. विशेष म्हणजे दहावी आणि बारावीच्या मुलांचे तो क्लास सुद्धा घ्यायचा. अभ्यासामध्ये पाहिल्यापासूनच हुशार असल्याने त्याने यूपीएससी हेच ध्येय ठेवले होते.

स्वप्नील याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्याने गारगोटी येथील आयसीआरई महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील एका कॉलेजमधून त्याने बी टेक पूर्ण केले. बी टेक नंतर गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यात राहूनच यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. आज अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये त्याने देशात 578 वी रँक मिळवत बाजी मारली आहे.

हेही वाचा : UPSC Topper Shruti Sharma : युपीएससीमधून देशात प्रथम आलेल्या श्रुती शर्माने यशाचे सांगितले 'हे' गमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.