ETV Bharat / state

'...तर कोल्हापुरातही आंदोलन पुकारण्यात येईल', व्यापाऱ्यांचा इशारा - Kolhapur traders news

पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कोल्हापुरातील छोट्या व्यवसायिकांनी दिला आहे.

Kolhapur
कोल्हापूर
author img

By

Published : Aug 9, 2021, 12:36 PM IST

कोल्हापूर - पुणे शहराच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात देखील व्यापाराची वेळ वाढवून द्यावी. व्यवसायाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्यथा पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कोल्हापुरातील छोट्या व्यवसायिकांनी दिला आहे. येत्या दोन दिवसात राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनास सुरुवात होईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

कोल्हापुरातील छोट्या व्यवसायिकांचा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सला छोट्या व्यावसायिकांचे वावडे -कोल्हापुरातील व्यापारी संघटनेची शिखर संस्था असलेले कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स संस्था ही लोकप्रतिनिधींच्या हातातील बाहुले बनले आहे. लोकप्रतिनिधी बोलेल ते निर्णय कोल्हापूर ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी घेत आहेत. मात्र त्यांचे छोट्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष आहे. छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता त्यांनी या निर्णयास पाठिंबा द्यावा, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे. कोल्हापूरातील रुग्णांचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी -सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर कमी आहे. तो दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे कोल्हापुरातील व्यवसायिकांचे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. कोल्हापुरात व्यवसाय करण्यास वेळ वाढवून द्यावी. ही वेळ सकाळी सात ते रात्री 8 वाजेपर्यंत करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - मसाई पठाराच्या कड्यावरून चारचाकी दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर

हेही वाचा - स्वतःचे गाव राखता आले नाही; अन् संजय राऊतांना कसले आव्हान देता, मुश्रीफांची बोचरी टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.