ETV Bharat / state

शिक्षकदिनी शिक्षकांची पायपीट, विविध मागण्यांसाठी कोल्हापूर व्हाया सांगली ते बारामती 'वारी' - कोल्हापूर शिक्षकांची पायी दिंडी

कोणत्याही परिस्थितीत बारामती गाठणारच, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. कोरोनाचा प्रचंड मोठा संकटकाळ असताना देखील शिक्षक जीवावर उदार होऊन हक्काच्या अनुदानासाठी बारामतीला जात आहेत. उद्या यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर, त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Sep 5, 2020, 3:16 PM IST

Updated : Sep 5, 2020, 3:25 PM IST

कोल्हापूर - राज्यातील सर्व घोषित, अघोषित शाळा व तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय तातडीने जारी करून विनाअनुदानित व टप्पा अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना २० टक्के व त्यापुढील देय टप्प्याप्रमाणे तत्काळ पगार सुरू व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 'कोल्हापूर, सांगली ते बारामती' अशा पायी दिंडी काढण्यात आली.

कोल्हापूर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अनुदानासाठी साकडे घालण्यासाठी ही दिंडी काढत आहोत, असे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. जगदाळे हे गेल्या 4 वर्षांपासून विनाअनुदानितच्या मागण्यांसाठी अनवाणी फिरत असून या दिंडीतही ते अनवाणी सहभागी झाले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले असून प्रचंड वेदना होत आहेत. तरीही मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आता माघार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - कागल तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यू; हसन मुश्रीफांची माहिती

कोणत्याही परिस्थितीत बारामती गाठणारच, असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रचंड मोठा संकटकाळ असतानादेखील शिक्षक जीवावर उदार होऊन हक्काच्या अनुदानासाठी बारामतीला जात आहेत. उद्या यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सदर आंदोलनाचे नियोजन केले आहे.

या पायी दिंडीत मराठवाडा विभागाचे कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, पंकज कळसकर, दीपक वडमारे, मधुकर बडे, संतोष राठोड आणि कोल्हापूर विभागातील कृती समितीचे सावता माळी, एस. पी. पाटील, पी. आर. पाटील, किरण नाईक, उत्तम जाधव यासह अन्य सहभागी झाले आहेत.

Last Updated : Sep 5, 2020, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.