कोल्हापूर - नवीन नियमावलीनुसार आजपासून अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. कालपर्यंत सकाळी 7 ते 11 वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. नियम शिथील होताच कोल्हापुरातील नागरिकांनी मात्र नियमावलीचे उल्लंघन करत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय सर्वच बाजारपेठेत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे दिसून येत आहे. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरातील नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मात्र नागरिकांनी अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्यास रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 372 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 4 हजार 246 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 216 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 3 हजार 910 झाली आहे. यामध्ये आता रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 216 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 4484 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 9394 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 69654 रुग्ण
51 ते 70 वर्ष -30640 रुग्ण
71 वर्षांवरील - 7984 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 22 हजार 372 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 47
2) भुदरगड - 34
3) चंदगड - 59
4) गडहिंग्लज - 59
5) गगनबावडा - 8
6) हातकणंगले - 213
7) कागल - 43
8) करवीर - 283
9) पन्हाळा - 101
10) राधानगरी - 28
11) शाहूवाडी - 12
12) शिरोळ - 105
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 154
14) कोल्हापुर महानगरपालिका - 336
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 48