ETV Bharat / state

कोल्हापूरकरांची चिंता वाढली; एकाच दिवशी आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

author img

By

Published : Aug 17, 2021, 9:51 AM IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मायक्रोबायोलॉजी विभागाकडून जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी मे, जून आणि जुलै महिन्यात प्रति महिना 100 असे नमुने पाठविण्यात आले होते. त्यामधील आजपर्यंत एकूण 7 जण डेल्टा प्लसने बाधित असल्याचे समोर आले आहे. यातील 1 रुग्ण मागील आठवड्यात तर 6 रुग्णांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला आहे.

Kolhapur residents' anxiety increased; 6 patients of Delta Plus were found
कोल्हापूरकरांची चिंता वाढली; एकाच दिवशी आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

कोल्हापूर - महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असतानाच कोल्हापुरात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कायम आहे. त्यातच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तब्बल 6 रुग्ण आढळले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खरंतर हे सर्व रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आता अहवाल प्राप्त झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने कोणीही घाबरण्याची गरज नाही असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Kolhapur residents' anxiety increased; 6 patients of Delta Plus were found
कोल्हापुरात एकाच दिवशी आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

कोणत्या भागात आहेत हे रुग्ण? -

प्राप्त झालेल्या अहवालानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मायक्रोबायोलॉजी विभागाकडून जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी मे, जून आणि जुलै महिन्यात प्रति महिना 100 असे सॅम्पल पाठविण्यात आले होते. त्यामधील आजपर्यंत एकूण 7 जण डेल्टा प्लसने बाधित असल्याचे समोर आले आहे. यातील 1 रुग्ण मागील आठवड्यात तर 6 रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हे सर्व रुग्ण सध्या कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत अशी माहितीही विभागाकडून देण्यात आली आहे. आढळलेल्या 7 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोल्हापूर शहरातील सानेगुरुजी वसाहत (2), विचारे माळ (1) आणि चव्हाण कॉलनी (1) या परिसरातील आहे तर उरलेल्या 3 रुग्णांमध्ये हातकणंगले तालुक्यातील 2 आणि करवीर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. यात 3 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश असून यामध्ये 18 वर्षाखालील एकाचा तर 60 वर्षांवरील दोघांचा समावेश आहे.

डेल्टा प्लस रुग्ण आढळल्यानंतर करण्यात येणारी कार्यवाही -

  • रुग्णांची सविस्तर माहिती घेणे, रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास, त्याच्या लसीकरणाचा इतिहास, त्याच्या आजाराचे स्वरूप याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती संकलित करण्यात येते.
  • युद्धपातळीवर जवळच्या शेजाऱ्यांचा शोध घेऊन रुग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांपैकी कोणाला कोरोना सदृश्य लक्षण असल्यास त्यांचे प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात येतात.
  • पुनःसंसर्ग झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या जातात.
  • लसीकरणानंतर कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने घेण्यात येतात.

म्युटेशन म्हणजे काय? -

डेल्टा प्लसबाबत नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होत आहे. त्याबाबत नागरिकांना सुद्धा शास्त्रीय मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. संबंधित विभागाकडून त्याबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, निसर्गामधील असणाऱ्या वेगवेगळे विषाणूच्या जनुकीय आकारात बदल होत असतात, त्यालाच म्युटेशन असे म्हणतात. त्यामुळे मानवी रुग्ण संख्येत होणारी वाढ, मृत्यू आदी बाबींवर या म्युटेशनचा काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी जिनोमिक सिक्वेन्सिंग तपासणी अत्यंत गरजेची असते. कोरोनाच्या संदर्भात सुद्धा वारंवार विषाणूच्या जनुकीय आजारात बदल होत आहेत. त्यामुळे संबंधित कार्यक्षेत्रात वाढलेले रुग्णसंख्या, लस घेऊन सुद्धा बाधित व्यक्ती, कोरोना प्रादुर्भाव होऊन देखील त्याची पुनरावृत्ती होते किंवा सर्वसाधारण आढळून येणारी लक्षणे नसणे आदी बाबी तपासून पाहणे आवश्यक आहे. याकरीता जनुकीय निर्धारण तपासणी केली जाते. त्यासाठी दर महिन्याला दिल्ली येथील संबंधित लॅबमध्ये 100 सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. मे, जून आणि जुलै महिन्यात कोल्हापुरातून सॅम्पल पाठविण्यात आले होते. त्यातील एकूण 7 जण डेल्टा प्लसने बाधित असल्याचे दिसून आले आहे. मात्र सद्या हे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा - राज्यात डेल्टा प्लसचे 76 रुग्ण; चिंता करु नका काळजी घ्या - आरोग्यमंत्री

आरोग्य विभागाचे आवाहन -

विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे हा विषाणूचा नैसर्गिक जीवनाचा भाग आहे. त्यासंदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोरोना अनुरूप वर्तनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे. शिवाय याला कोणीही घाबरून जाऊ नये, सद्या आढळलेले सर्व रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे चिंतेचे काहीही कारण नाही असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासासह न्यायालयाने ठोठावला 45 हजारांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.