ETV Bharat / state

कोल्हापुरात ४ गावठी पिस्तूल जप्त, पंधरा दिवसांत तिसरी मोठी कारवाई - arm seized

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकोर्डवरील २ गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे ४ गावठी पिस्तूल, मॅक्झिन आणि ८ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.

कोल्हापूर पोलीस अटक केलेल्या आरोपींसोबत
author img

By

Published : Apr 6, 2019, 11:44 PM IST

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकोर्डवरील २ गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे ४ गावठी पिस्तूल, मॅक्झिन आणि ८ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोल्हापूर पोलिसांनी बेकायदा बंदूक वापरणारे आणि विक्री करणाऱ्यांवर तिसरी मोठी कारवाई केली आहे.

कोल्हापूर पोलीस अटक केलेल्या आरोपींसोबत

जिल्हा पोलीस दलाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शोध पथकाला एक व्यक्ती चंदगड परिसरामध्ये शस्त्रविक्री करायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चंदगड परिसरात सापळा रचला होता.

चंदगड तालुक्यात राहणारा विकी धोंडीबा नाईक आणि कोल्हापूर लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणारा सुनील भिकाजी घाटगे या दोघांचा संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये ४ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, १ मॅक्झिन आणि ८ जिवंत काडतूसे असा २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील दोन्हीही गुन्हेगार पोलिसंच्या रेकॉर्डवरील असून पोलिसांची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:अँकर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघा रेकोर्डवरील गुन्हे गारांकडून देशी बनावटीचे ४ गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि ८ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील कोल्हापूर पोलिसांची बेकायदा बंदुका वापरणाऱ्या वर आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर तिसरी मोठी कारवाई आहे.Body:व्हीओ २ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने बेकायदा शस्त्र बाळगणे आणि विक्री करणे अशांवरती कारवाईचा धडाका लावला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी च्या स्थानिक गुन्हे शोध पथकाला एक इसम चंदगड परिसरामध्ये शस्त्रविक्री करायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चंदगड परिसरात आपला सापळा रचला. यावेळी चंदगड तालुक्यात राहणारा विकी धोंडीबा नाईक आणि कोल्हापुर लक्षतीर्थ वसाहत मध्ये राहणारा सुनील भिकाजी घाटगे या दोघांचा शस्त्र विक्रीसाठी आल्याचा संशय आल्यानं त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तसेच त्यांच्या बँगेची झडती घेतली त्यामध्ये या दोघांकडून ४ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, १ मॅक्सिन आणि ८ जिवंत राउंड असा २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील दोघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.

बाईट- अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक कोल्हापूर)

व्हीओ २ : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर पोलिसांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास नक्कीच मदत होईल.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.