ETV Bharat / state

अबब.. 2020 मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 'इतका' दंड वसूल - kolhapur traffic police latest news

2020 मध्ये जिल्ह्यातील एकूण एक लाख 27 हजार 11 जणांनी मोटार वाहन कायद्याचा भंग केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडून तब्बल 91 लाखांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे.

कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी

author img

By

Published : Jan 12, 2021, 9:35 AM IST

कोल्हापूर - 2020 मध्ये जिल्ह्यातील एकूण एक लाख 27 हजार 11 जणांनी मोटार वाहन कायद्याचा भंग केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडून तब्बल 91 लाखांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे. कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिलीये.

कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी
★एकूण केसेस आणि वसूल केलेला दंड - 2020 साली वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या जिल्ह्यात तब्बल 1 लाख 27 हजार 11 केसेस प्राप्त झाल्या. त्यांना तब्बल 2 कोटी 33 लाख 12 हजार 900 इतका दंड करण्यात आला आहे. त्यातील एकूण 90 लाख 99 हजार 700 इतका दंड वसुल करण्यात आला आहे. उर्वरित 1 कोटी 42 लाखांचा दंड अद्याप वसूल करणे बाकी आहे, अशी माहिती स्नेहा गिरी यांनी दिली. ★ 2019 साली एकूण केसेस आणि एकूण दंड- 2019 मध्ये वर्षभरात तब्बल 1 लाख 11 हजार 787 इतक्या केसेस होत्या. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 56 लाख 14 हजार 750 इतका दंड वसूल करण्यात आला होता. 2019 च्या तुलनेत 2020 या वर्षात एकूण 6 हजार केसेसची वाढ झाली आहे. मात्र दंड 60 लाख रुपये कमी वसूल झाला आहे. 2020 मध्ये एकूण 90 लाख 99 हजार 700 इतका दंड वसुल करण्यात आला आहे. ★ 2020 मधील वसूल न झालेल्या दंडाबाबत संबंधितांना लवकरच नोटीस -वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकांनी सिग्नल मोडलेले असतात तर अनेकजण भरधाव गाडी चालवत असतात. अशा अनेकांना त्यांच्या दंडाबाबत माहिती नसते किंवा काहींना त्याबाबत त्यांच्या मोबाईलवर संदेश सुद्धा पाठवला जातो. मात्र काहीजण याकडे दुर्लक्ष करत असतात. 2020 या वर्षात सव्वा लाखांहून अधिक वाहनचालकांवर तब्बल 2 कोटी 33 लाख 12 हजार 900 इतका दंड करण्यात आला आहे. त्यातील 1 कोटी 42 लाखांचा दंड अद्याप वसूल करणे बाकी आहे. त्यामुळे उर्वरित सर्वांकडून लवकरच तो दंड बसुल करण्यात येणार आहे. त्यासाठी नोटीस पाठवण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्या सर्वांकडून लवकरच दंड वसूल केला जाईल असेही गिरी यांनी म्हटले आहे. ★लॉकडाऊन मध्ये नियमांचे उल्लंघन केलेल्या 7 हजार गाड्यांवर कारवाई -लॉकडाऊन काळात अनेक नियमावली बनवण्यात आल्या होत्या. या नियमांचे अनेकांनी उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आल्या होत्या. यामध्ये 7 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय अनेकांच्या गाड्या सुद्धा 3 महिने जप्त करण्यात आल्या होत्या, अशी माहिती सुद्धा गिरी यांनी दिली.हेही वाचा - 'केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती धोक्याबाहेर आणि स्थिर'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.