ETV Bharat / state

'पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेला शाप'

आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणारे गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेला शाप आहे. पडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली आहे, असे म्हणत कोल्हापूर राष्ट्रवादीने पडळकरांवर निशाणा लगावला आहे.

Kolhapur ncp criticism on gopichand padalkar
पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेला शाप, कोल्हापूर राष्ट्रवादीचा निशाणा
author img

By

Published : Jun 24, 2020, 8:37 PM IST

कोल्हापूर - आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणारे गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेला शाप आहे. पडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली आहे. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून त्यांनी त्यांचा घोर विश्वासघात केला आहे. त्यांची ही भाषा आणि प्रवृत्ती म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार असल्याची टीका कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकाद्वारे केली आहे.

काय म्हटले आहे पत्रकात

गोपीचंद पडळकर यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे, त्याच्या दुप्पट वर्ष शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण आणि बहुजनांच्या कल्याणार्थ खर्च केली आहेत. त्यांची ही भाषा आणि प्रवृत्ती म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे. शरद पवार यांच्यावर बोलताना त्यांनी आपलं वय, सामाजिक कर्तुत्व आणि समाजकारण- राजकारणातील योगदान किती, याचेही भान ठेवायला हवं होतं. गोपीचंद पडळकर यांचे आत्ता जे वय आहे, त्या वयात शरद पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उभी हयात त्यांनी महाराष्ट्राच्या आणि विशेषता बहुजन समाजाच्या विकासासाठी खर्च केली आहे. त्यामुळे यापुढे, असे काही वक्तव्य करताना त्यांनी विचार करून बोलावे अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकाद्वारे देण्यात आला.

या पत्रकावर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भैय्या माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, सरचिटणीस अनिल साळुंखे आदींच्या सह्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.