ETV Bharat / state

कोल्हापुरात 'उद्धव ठाकरे गटाला' संधी; पण, दोन गट एकत्र येणार का?

शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेल्या कोल्हापूर शहरात (२००४ व २०१९ अपवाद वगळता) सेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे महापालिकेत फटका बसत आहे. राज्यात सत्ता असलेल्या या पक्षाला आगामी काळातील महापालिका निवडणुकीत पक्ष वाढवण्याची नामी संधी चालून आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात एकच उद्धव गट म्हणून घोषणा केली असली तरी, आजही या दोन गटाची तोंडे दोन दिशेला आहेत. त्यामुळे हे दोन गट एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, ताराराणी गटाला भारी पडू शकतात. पण, हे दोन गट एकत्र येणार का? पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:20 PM IST

कोल्हापूर - महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेने कायम महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महापौर निवड असो वा सभापती निवड असो, सेनेच्या नगरसेवकांनी गैरहजर राहत, अप्रत्यक्षपणे नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली आहे. १९८० पासून कोल्हापूर शहरात २००४ व २०१९ चा अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेचा आमदार राहिला आहे. पण, महापालिकेतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नेहमीच शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागते. सध्या महापालिकेत सेनेचे चार नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीच्या अगोदर कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राज्यात आणि महापालिकेत तीन पक्षांचे सरकार असले तरी कोल्हापूर शहरातील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे केवळ स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी महापालिकेत आजवर सेनेने सत्ता भोगली नाही.

कोल्हापुरात 'उद्धव ठाकरे गटाला' संधी.. पण, दोन गट एकत्र येणार का?

शिवसेनेतील गटबाजी
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर याचा एक गट स्वतंत्र कार्यरत आहे. तर दुसरीकडे आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांचा गट आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा कार्यरत असते. प्रत्येक गटांचे कार्यकर्ते कट्टर असले तरी प्रामाणिक शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे विचार जपले आहेत.
अंतर्गत गटबाजीतील वाद सोडवण्यात अपयश
तत्कालीन संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी देखील पवार व क्षीरसागर यांच्यातील वाद संपवून समेट घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना देखील यात अपयश आले. पवार व क्षीरसागर यांच्यातील अंतर्गत वादाचा चेंडू मुंबईच्या शिवसेना भवनापर्यंत गेला, मात्र तिथे देखील अपयश आले. अखेर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना नाराज न करण्याची भूमिका घेत दोघांना तीच-तीच पदे देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष पदे देण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय पवार, लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष म्हणून विजय देवणे आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघासाठी मुरलीधर जाधव यांना पद देण्यात आले.
..मग महापालिका निवडणुकीत विजय का नाही?
सन 1980 सालच्या विधानसभा निवडणुकीपासून 2004 व 2019 विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता नेहमीच कोल्हापुरात शिवसेनेचा आमदार राहिला आहे. तर जिल्ह्यात सध्या दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे नेते कोल्हापूर शहर शिवसेना हा बालेकिल्ला असल्याचे दावा करत असले तरी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत याचे रूपांतर मताधिक्यात का होत नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
उद्धव ठाकरे गट म्हणून कामाला लागा....
मंत्री उदय सामंत यांची कोल्हापूर संपर्कमंत्री पदी निवड झाल्यानंतर नुकताच त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी सामंत यांनी, कोणत्याही गटबाजीला थारा देणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून शिवसेनेत एकच उद्धव ठाकरे गट राहील. त्यानुसार कामाला लागा, असे इशारा वजा आवाहन शिवसैनिकांना केले होते. आमचं पण ठरलंय, जे काही ठरलंय ते वेळ येईल, तसे जाहीर केले जाईल. आमच्या एकीची वज्रमूठ कोणी भेदू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.
शिवसेनेचा मेळावा आणि खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांची अनुपस्थिती
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच शिवसेनेने क्षीरसागर गटाने मेळावा घेतला. या मेळाव्यात महापालिकेवर यंदा सेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन माजी आमदार क्षीरसागर यांनी केले होते. मात्र, या मेळाव्याला जिल्ह्यातील दोन खासदार, एक आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रित केले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीची किनार या मेळाव्यात दिसून आली.
नगरसेवक सेनेचे, पण काँग्रेसच्या गोटात
सध्या महापालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. नियाज खान, अभिजित चव्हाण, प्रतिक्षा उत्तुरे आणि राहुल चव्हाण हे सेनेचे चार नगरसेवक आहेत. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेने हातमिळवणी केल्यानंतर परिवहन सभापती पद पदरात पाडून घेतले. हे चारही नगरसेवक सेनेचे असले तरी काँग्रेसच्या गटाबरोबरच सक्रिय आहेत. काँग्रेस नेत्याची कृपादृष्टी या चार नगरसेवकांवर आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे चार नगरसेवक सेनेत राहणार की काँग्रेससोबत जाणार? हा देखील प्रश्न आहे.

महापालिकेत सर्वात प्रथम महाविकास आघाडी

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. मात्र, याची सुरुवात कोल्हापुरात झाली होती. महापालिकेच्या निवडणुकीतनंतर सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येऊन शिवसेनेला सोबत घेतले आणि सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाविकास आघाडीची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे मानले जाते. पण, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हीच महाविकास आघाडी कायम राहणार का? हा देखील प्रश्न आहे. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी यापूर्वीच स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आर्थिक स्थिती पाहता यांच्यापुढे शिवसेनेचा निभाव लागणार का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

...तर महाविकास आघाडीची युती कोल्हापुरातून तुटणार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीची मोट बांधून सत्ता स्थापन केली. मात्र, कोल्हापूर महापालिकेत तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वात प्रथम बिघाडी होणार ते कोल्हापुरातून असेही मानले जाते.

भगवा फडकवायचा असेल तर एकत्र यावे..

महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भगवा फडकवायचा असेल तर शिवसेनेतील दोन्ही गटांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे राजकीय विश्लेषक सतीश सरीकर यांचे मत आहे. हे दोन गट एकत्र आले तर आगामी निवडणुकीत शिवसेना किंगमेकर ठरू शकते, असे देखील सरीकर म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत सेनेचे यश दिसेल..

गेल्या काही निवडणुकीत शिवसेनेचे म्हणावे तसे यश दिसून येत नाही. तसेच शिवसेनेमध्ये कोणतीही गटबाजी नाही. प्रामाणिक शिवसैनिक हा त्यांचे काम करत असतो. विरोधकांच्या आर्थिक बाबींपुढे शिवसेना कधी शेवटच्या दोन दिवसात पडते. येणार्‍या निवडणुकीत शिवसैनिक प्रामाणिकपणे लढून आपले यश दाखवून देईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.