ETV Bharat / state

कोल्हापूर महापालिकेचा 2020-21 चा नवीन अर्थसंकल्प जाहीर - कोल्हापूर बातमी

2019-20 चा सुधारित आणि 2020-21 चा नवीन अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे सादर केला.

kolhapur-municipal-corporation-announces-new-budget-for-2020-21
कोल्हापूर महानगरपालिकेचा 2020-21 चा नवीन अर्थसंकल्प जाहीर...
author img

By

Published : Jun 12, 2020, 3:36 PM IST

कोल्हापूर- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मार्च महिन्यात चालू वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक सादर करता आले नाही. आता लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची स्थगित झालेली अर्थसंकल्पीय सभा आज पार पडली.

कोल्हापूर महानगरपालिकेचा 2020-21 चा नवीन अर्थसंकल्प जाहीर...

कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक निर्बंध आले होते. त्यामुळे चालू वर्षाचे महापालिकेचे आर्थिक अंजापत्रकही रखडले होते. मात्र, आज ते पार पडले. फिजिकल डिस्टन्स राखत केवळ मोजक्या नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती. तर बाकीचे सर्व नगरसेवकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेमध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी 2019-20 चा सुधारित आणि 2020-21 चा नवीन अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे सादर केला. यामध्ये महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प आणि वित्त आयोग मिळून 1 हजार 88 कोटी 77 लाख तरतूद असलेल्या जमेचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सभापती कवाळे यांनी विशेष महासभेत सादर केला. यामध्ये विविध विकासकामे तसेच सेवा सुविधा देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आणि योजना-
मनपाच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी साहित्य उपलब्ध करणे, सावित्रीबाई फुले रुग्णालयासाठी लॅमिनेट एयर फ्लो मशीन उपलब्ध करणे, शहरात टेबल पार्किंगची व्यवस्था करणे, महानगरपालिकेच्या वीज बिलामध्ये आर्थिक बचत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करुन महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व विभागीय कार्यालय आणि रुग्णालये सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार, अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्प, छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि महात्मा गांधी पुतळा सुशोभीकरण, महानगरपालिकेतील नागरिकांची कामे अ‌ॅपवर होणार, शहरातील ओपन स्पेस बंदिस्त करुन त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था होणार, महिलांसाठी विशेष बसची सुविधा, महानगरपालिकेच्या विविध योजना उपक्रम तसेच आरोग्य आणि स्वच्छता याबाबत नागरिकांना माहिती देण्याच्या अनुषंगाने कृती अभियान राबवणार, ऑक्सिजन पार्क संरक्षित करण्यात येणार, शहरातील सर्व नाले ट्रेश फ्री होणार, सर्वच नाल्यांमध्ये लोखंडी जाळ्या बसविण्यात येणार, पंचगंगा घाट व मैदाने या ठिकाणी लाईटची व्यवस्था, सर्वच प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मिनी विरंगुळा केंद्र, भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक यंत्रणेला भरीव तरतूद, वर्दळीच्या ठिकाणी एअर फिल्टर बसविणार, त्यासाठी 60 लाखांची तरतूद, अहिल्याबाई होळकर स्मारक बांधणार, शहरांतर्गत अत्यावश्यक ठिकाणी कूपनलिका होणार, शहरात क्लीन डर्टी स्पॉट उपक्रम, सेफ सिटी प्रकल्प टप्पा 2 राबिण्यात येणार.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.