ETV Bharat / state

गर्दी केल्यास होणार अँटिजेन टेस्ट; मनपा आयुक्तांचा आदेश

author img

By

Published : Apr 17, 2021, 8:24 AM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. कोल्हापूरमध्ये कोरोना रूग्णांची वाढत आहे. मात्र, तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. अशा नागरिकांची रस्त्यावरच अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Kolhapur Municipal Commissioner antigen test order
कोल्हापूर मनपा आयुक्त अँटिजेन टेस्ट आदेश

कोल्हापूर - कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र, तरीही काही नागरिक अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर फिरताना दिसतात. अशा व्यक्ती आढळल्यास संबंधित व्यक्तीची आजपासून (शनिवार) मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. जर संबंधित व्यक्ती बाधित आढळला तर तात्काळ त्याला विलगिकरण कक्षात पाठवण्यात येणार आहे.

मनपा आयुक्तांनी केली पाहणी -

अत्यावश्यक कामाच्या नावाखाली अनेक नागरीक बाहेर पडून गर्दी करत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरीकांची जास्त गर्दी होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या समवेत अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत आहेत. संचारबंदी असूनही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका अधिकच वाढला आहे. शहरात रस्त्यावरच रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्याच्या सुचना बलकवडे यांनी उप-आयुक्त निखिल मोरे यांना दिल्या.

महानगरपालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील गर्दीच्या ठिकाणी जागेवरच कोवीड चाचणी केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यास त्याला तत्काळ विलगीकरण कक्षात पाठवले जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.